Loan Interest Waive : छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेने घेतला व्याज माफीचा ठराव

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank : राज्य सरकारने श्री रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेसाठी ६४ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. आता जिल्हा बँकेने त्या कर्जावरील व्याज माफीचा ठराव घेतला.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Chhatrapatio Sambhajinagar News : राज्य सरकारने श्री रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेसाठी ६४ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. आता जिल्हा बँकेने त्या कर्जावरील व्याज माफीचा ठराव घेतला. त्यामुळे या योजनेअंतर्गत कर्जदार शेतकऱ्यांच्या शेतीवरील कर्जाचा बोजामुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्री रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कर्जाचा प्रश्‍न ३५ वर्षांपासून रखडत पडला होता. वैजापूर तालुक्यातील १४ गावांतील जवळपास २ हजारांवर शेतकऱ्यांच्या सातबारावर उपसा सिंचन योजनेच्या कर्जाचा बोजा आहे.

३० जून १९९७ अखेर कर्ज व संचित व्याज योजनेचे २० समान वार्षिक हप्ते करून देत योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा बँकेने १९८८ मध्ये २५५.१७ लाखांचे कर्ज वितरण करून १९९८ मध्ये योजना पुन्हा कार्यान्वित केली. पाणी साठ्यातील घट, अपुरा व अनियमित वीजपुरवठा, वीजबिलाची थकबाकी यामुळे फेब्रुवारी २००० मध्ये योजना बंद झाली.

Crop Loan
Loan Interest Waive : आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी

३० जून २०२४ अखेर जिल्हा बँकेचे योजनेकडून मुद्दल ६४ कोटी २६ लाख ५९ हजार व व्याजापोटीचे १४५ कोटी २७ लाख ९० हजार अशी एकूण २०९ कोटी ५४ लाख ४९ हजार रुपये येणे बाकी होती. नुकतीच राज्य सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे मूळ ६४ कोटी रुपये कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. परंतु या कर्जावर वाढलेल्या व्याजाचे काय हा प्रश्‍न बाकीच होता.

त्यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कर्जाचा बोजा कमी होण्यासाठी एकतर सरकारने १०० कोटींचे पॅकेज बँकेला द्यावे किंवा दीडशे कोटी दहा वर्षांसाठी बँकेला व्याज वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

Crop Loan
Loan Interest Concession Scheme : व्याज सवलत योजनेचा जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना लाभ

या बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुनराव गाढे पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, मंत्री अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, दिनेश परदेशी, रामहरी जाधव, मनोज राठोड आदींची उपस्थिती होती.

शासन निर्यातीला अटीच्या अधीन राहून बँकेने उपसा सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफीचा ठराव सर्वानुमते घेतला. सहकार विभागामार्फत तो शासनाकडे जाऊन लवकरच योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमुक्त होतील.
- अर्जुनराव गाढे पाटील, अध्यक्ष,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com