Ajit Pawar : छत्रपती संभाजी महाराज, हुतात्मा राजगुरू स्मारकाला मिळणार गती

Sambhaji Maharaj momentum : हवेली तालुक्यातील तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ व शिरूर तालुक्यातील वढू बु. येथील समाधीस्थळ स्मारक विकास आराखडा आणि खेड तालुक्यातील राजगुरूनगरमधील हुतात्मा राजगुरु स्मारक विकास आराखडा तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन आराखड्याबाबत पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेतली.
Ajit pawar
Ajit pawar Agrowon
Published on
Updated on

Pune News : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू (ता. शिरूर) आणि हुतात्मा राजगुरू यांच्या राजगुरुनगर (ता. खेड) येथील स्मारकाला गती मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही स्मारकांच्या अनुक्रमे २६९ कोटी आणि २५३ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्याबाबत आढावा बैठक घेऊन, प्रकल्प तातडीने सुरू करण्याच्या सूचना शुक्रवारी (ता. २५) शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिल्या.

Ajit pawar
Shivai E Vehical Bus : शिवशाही बंद शिवाई सुरू, कोल्हापूर पुणे मार्गावर ई व्हेईकल धावणार

या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विकास करताना स्मारकाच्या उभारणीमध्ये जुन्या- नव्या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्यस्वरूपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. हुतात्मा राजगुरू यांचे राजगुरूनगर येथील स्मारकही भव्य आणि प्रेरणादायी होईल असे विकसित करावे.’’

या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेशकुमार, मनपा आयुक्त विक्रमकुमार, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर आदी उपस्थित होते.

Ajit pawar
Ajit Pawar : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार- अजित पवार

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आराखड्यात ३ डी प्रोजेक्शन, मॅपिंग, होलोग्राफी, मोशन सिम्युलेशन आदी अत्याधुनिक संकल्पनांचा वापर करून महाराजांशी संबंधित ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सादरीकरणाला एक प्रकारचा जीवंतपणा येणार असल्याचे त्यांनी सांगितले

तर हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकात जन्मखोली, थोरला वाडा आदी भाग पुरातत्व विभागाकडून तर संग्रहालय, तालिम, वाचनालय आदी भाग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकसित करण्यात येणार आहे. यामध्येही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. तसेच पारंपरिक बांधकाम शैलीचाही सुयोग्य वापर करावा, अशाही सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com