sandeep Shirguppe
कोल्हापूर-पुणे (स्वारगेट) मार्गावर आज, शुक्रवारपासून राज्य परिवहन महामंडळाच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक (शिवाई) बस धावणार आहेत.
आरामदायी प्रवासाचा आनंद प्रवाशांना घेता येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानेही इलेक्ट्रिक बसेसचा पर्याय स्वीकारला आहे.
कोल्हापूर विभागात ग्रीन सेल कंपनीच्या चार इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बस आज (ता.२५) पासून कोल्हापूर, पुणे या मार्गावर धावणार आहेत.
याबाबत यंत्र अभियंता यशवंत कानतोडे व परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली.
कोल्हापूर विभागाला चार तर पुणे विभागाला चार अशा आठ बसेस या मार्गावर धावतील. एका विभागातून या बसेसच्या रोज आठ फेऱ्या होणार आहेत.
खासगी ठेकेदाराच्या या बसेस असून, ४५० कि. मी. पर्यंत ४८ तर त्यापुढील प्रवासासाठी ४५ रुपये इतके भाडे 'परिवहन'कडून दिले जाणार आहे.
बसमध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, रेकॉर्डिंगची सुविधा, तसेच चालकाने मद्यप्राशन केले असेल, किंवा तो चालू प्रवासात डुलक्या, जांभई देत असेल तर त्याचा सिग्नल त्वरित प्रवाशांना मिळणार आहे.
ही इलेक्ट्रिक बस विनावाहक असून, हिचा तिकीट दर शिवशाहीप्रमाणे ५०० रुपये इतका आहे. कोल्हापूर विभागात टप्प्याटप्प्याने ५० बस दाखल होणार आहेत.
४५ प्रवाशांची क्षमता असणाऱ्या या बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, ७० वर्षांवरील नागरिक, महिला यांना शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू आहेत.