Palkhed Canal Water : पालखेड डावा कालवा वितरिका ४६ ते ५२ हा खरीप कालवा आठमाही करा

Agriculture Irrigation : पालखेड डावा कालवाअंतर्गत येवला तालुक्यातील किमी ११० ते १३० वितरिका ४६ ते ५२ खरीप कालवा आठमाही करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Nashik News : पालखेड डावा कालवाअंतर्गत येवला तालुक्यातील किमी ११० ते १३० वितरिका ४६ ते ५२ खरीप कालवा आठमाही करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत भुजबळ यांनी गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ विभागाचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जलसंपदा विभागाचे सचिव यांना पत्र दिले आहे.

मंत्री भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की पालखेड डावा कालवाअंतर्गत येवला तालुक्यातील किमी ११० ते १३० वितरिका क्र. ४६ ते ५२ खरीप कालवा आठमाही करण्याच्या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वी उग्र स्वरूपाचे आंदोलन केलेले आहे.

त्यानुसार मुख्य अभियंता (जलसंपदा) जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांनी शासनास पाठविलेला प्रस्ताव–२००९ अन्वये वितरिका क्र. ४६ ते ५२ च्या लाभक्षेत्रातील लाभधारकाच्या मागणीनुसार रब्बी हंगामात मंजूर पीक रचनेनुसार ३२६.४७ दलघफू पाणी आवश्यक आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation Crisis: शहरातील सांडपाण्यामुळे सिंचनाचा प्रश्‍न गंभीर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दमणगंगा (एकदरे)-गोदावरी(वाघाड) नदी जोड प्रकल्पातील वाघाड धरणात येणारे पाणी ४६ ते ५२ आठमाहीसाठी राखून हा कालवा आठमाही करण्यात यावा. वळण योजनांमुळे पालखेड समूहातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे.

Agriculture Irrigation
Solar Agriculture Irrigation : सौर ऊर्जेवरील सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान ः नितीन गडकरी

त्यामधून ही गरज भागविणे सहज शक्य आहे. लाभधारक शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रात पाणीवापर संस्था स्थापन करून त्यावर वितरिका संघदेखील स्थापन करण्याचे नियोजन आहे.

या लाभधारक घनमापन पद्धतीने पाणी घेण्यास तयार असल्याने सिंचन क्षेत्रात वाढ होऊन राष्ट्रीय उत्पादनात देखील वाढ होणार आहे. त्यानुसार येवला तालुक्यातील पालखेड डावा कालवा ११० ते १३० वितरिका ४६ ते ५२ खरीप कालवा आठमाही करण्यात यावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com