डॉ. सुरेश दोडके, डॉ. सुदर्शन लटके
Chana Production : हरभरा हे पीक आंतरपीक आणि फेरपालटीसाठी उत्कृष्ट आहे, यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते. हे पीक प्रामुख्याने जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर घेतले जाते. लागवड करताना नवीन विकसित वाणांचा जर वापर केला तर उत्पादनात निश्चितपणे वाढ होते. हरभरा पिकात देशी व काबुली असे दोन प्रकार आहेत. काबुली हरभऱ्याच्या तुलनेत देशी हरभऱ्यात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक असते. कमी पाण्यावर देखील अधिक उत्पादन मिळते. काबुली वाणाची पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक असतो. आपल्याकडे प्रामुख्याने देशी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
देशी वाण
विजय
कालावधी : जिरायती ८५-९० दिवस, बागायती १०५-११० दिवस
पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता, मर रोगास प्रतिकारक्षम, जिरायती, बागायत आणि उशिरा पेरणीस योग्य
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती : प्रायोगिक उत्पादन : १४-१५, सरासरी उत्पादन : १४
बागायती : प्रायोगिक उत्पादन: ३५-४०, सरासरी उत्पादन: २३
उशिरा पेरणी : प्रायोगिक उत्पादन: १६-१८ सरासरी उत्पादन: १६
फुले विश्वराज
पक्वता कालावधी : ९५-१०५ दिवस
पिवळसर तांबूस रंगाचा, मध्यम दाणे, जिरायती पेरणी साठी योग्य, मर रोग प्रतिकारक्षम, पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती प्रायोगिक : २८-२९ सरासरी उत्पादन: १५
बीडीएनजी-७९७ (आकाश)
कालावधी : १०५-११०
मराठवाडा विभागासाठी प्रसारित, मर रोग प्रतिकारक्षम, मध्यम आकाराचे दाणे, अवर्षण प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विंटल/ हे.):
जिरायती उत्पादन : १४-१५,
बागायती उत्पादन : २०-२२
जाकी-९२१८
विदर्भ विभागासाठी प्रसारित, मर रोग प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती उत्पादन: १५-१६
बागायत उत्पादन: २६-२८
दिग्विजय
कालावधी :
जिरायती ९०-९५ दिवस, बागायत ११०-११५ दिवस
पिवळसर तांबूस दाणे, मर रोगास प्रतिकारक्षम, जिरायती बागायत तसेच उशिरा पेरणीत योग्य
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती : प्रायोगिक उत्पादन : १४-१५, सरासरी उत्पादन: १४
बागायती : प्रायोगिक उत्पादन: ३५-४० सरासरी उत्पादन: २३
उशिरा पेरणी : प्रायोगिक उत्पादन: २०-२२ सरासरी उत्पादन: २१
विशाल
कालावधी : बागायती ११०-११५ दिवस
आकर्षक पिवळसर टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारक्षम, घाटे आकाराने मोठे असून गर्द हिरवे असतात
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती : प्रायोगिक उत्पादन: १४-१५ सरासरी उत्पादन: १३
बागायती : प्रायोगिक उत्पादन: ३०-३५ सरासरी उत्पादन: २०
फुले विक्रांत
कालावधी : १०५-११० दिवस
पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे, बागायती पेरणी साठी योग्य
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
उत्पादन क्षमता ः ४१.६६
सरासरी उत्पादन ः २०
पीडीकेव्ही कांचन
पक्वता कालावधी : १०५-११०,
मर रोग प्रतिकारक्षम, टपोरे दाणे, विदर्भ विभागासाठी प्रसारित
उत्पादन (क्विंटल/ हे.)
बागायत प्रायोगिक : ३५-४२,
सरासरी उत्पादन : १८-२०
पीडीकेव्ही कनक
पक्वता कालावधी : १०८-११०
यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी योग्य, संरक्षित ओलीताखाली लागवडीसाठी शिफारस
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात साठी प्रसारित
उत्पादन (क्विंटल/ हे.)
सरासरी उत्पादन : १८-२०
परभणी चना-१६
कालावधी : ११०-११५
फक्त मराठवाडा विभागासाठी प्रसारित, यांत्रिकीकरणासाठी सुलभ, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विंटल/ हे.): २३-३०
जवाहर ग्राम-२४ (जेजी-२४)
पक्वता कालावधी : ११०-११५
मर रोग प्रतिकारक्षम, यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त वाण, १०० दाण्याचे वजन २९.३ ग्रॅम
उत्पादन (क्विंटल/ हे.): २५-३०
आरव्हीजी-२०४ (राजविजय २०४)
पक्वता कालावधी : १०८-१११
यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त वाण, मध्यम मर रोग प्रतिकारक्षम
उत्पादन (क्विंटल/ हे.) : २५-३०
फुले विक्रम
कालावधी : १०५-११० दिवस
घाटे जमिनीपासून एक फुटाच्यावर लागतात, वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त वाण, मर रोगास प्रतिकारक्षम, अधिक उत्पादन क्षमता.
उत्पादन (क्विंटल/ हे.) :
जिरायती प्रायोगिक: १६-१८, सरासरी उत्पादन: १६
बागायती प्रायोगिक:४०-४२ सरासरी उत्पादन: २२
उशिरा पेरणी प्रायोगिक : २२-२४, सरासरी उत्पादन: २१
काबुली वाण
विराट
कालावधी : ११०-११५
अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारकक्षम, महाराष्ट्रासाठी प्रसारित, १०० दाण्यांचे वजन ३५ ग्रॅम
उत्पादन (क्विंटल/ हे.):
जिरायती प्रायोगिक उत्पादन: १०-१२ सरासरी उत्पादन: ११
बागायती प्रायोगिक उत्पादन: ३०-३२, सरासरी उत्पादन: १८
कृपा
कालावधी : १०५-११०
जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, १०० दाण्यांचे वजन ५९.४ ग्रॅम
मर रोग प्रतिकारकक्षम, सफेद पांढरे दाणे, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यासाठी प्रसारित
उत्पादन (क्विंटल/ हे.):
सरासरी उत्पादन-१६-१८, प्रायोगिक उत्पादन: ३०-३२
काक-२, पीकेव्ही-२
कालावधी : १००-१०५
अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारकक्षम, १०० दाण्यांचे वजन ३७-४० ग्रॅम
उत्पादन (क्विंटल/ हे.): २६-२८
पीकेव्ही-४
पक्वता कालावधी : १००-११०
अधिक टपोरे दाणे, मर रोगास मध्यम प्रतिकारकक्षम, विदर्भ करिता प्रसारित.
१०० दाण्यांचे वजन ५०-५३ ग्रॅम
उत्पादन (क्विंटल/ हे.): १६-१८
डॉ. सुरेश दोडके, ९६०४२६११०१,
(प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.