Human Diet: आहारासंदर्भातील बदलती मानसिकता

Food Protein Diet: आजचा शहरी समाज - ज्याचे महिन्याचे उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त आहे; त्याचा अन्न सेवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. प्रथिनांचा विचार करीत असताना प्राणिजन्य प्रथिनांपेक्षा वनस्पतिजन्य प्रथिनांची मागणी वाढत आहे. भात, गहू यांपेक्षा ज्वारी, बाजरी, नागली, राळा, भगर यांसारखी भरडधान्ये आहारात घेण्याचे प्रमाण वाढत आहे.
Food
FoodAgrowon
Published on
Updated on

Diet Regarding Changing Mindset: शहरी नागरिकांना केवळ ‘उदरभरण’ नको; आहारातून पोषणही हवे. फळे अणि भाजीपाला यांसाठी आता जवळपास धान्याएवढाच, किंबहुना त्याहूनही अधिक खर्च करायचा आहे. कडधान्ये आणि भरडधान्याला दिवसेंदिवस मागणी वाढते आहे. दूध, अंडी, मासे व सुकामेवा यांच्या रूपात नव्या पिढीला हवे ‘स्मार्ट प्रोटीन’! या आधुनिक ग्राहकांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी देखील आपल्या पीक पद्धतीत आता बदल करायला हवा. प्रगतीसोबत पैसा येतो आणि पैसा आल्यानंतर प्रत्येकाची जीवनशैली बदलते.

शहरी समाजाकडे मागील दोन-तीन दशकांपासून चांगल्या स्वरूपात पैसा येत आहे. अर्थात, ग्रामीण समाजामध्येही हा बदल दिसतो आहे; परंतु त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पूर्वीच्या काळी पैसा हा प्राथमिक गरजा म्हणजेच ‘रोटी, कपडा और मकान’ या बाबींसाठी वापरला जात होता. परंतु आज संपत्ती खर्च करण्यामागच्या संकल्पना बदलल्या आहेत.

Food
Milk Food: दूध हे परिपूर्ण अन्न

हरितक्रांतीपूर्वी जवळ जवळ ७० टक्के रक्कम ही अन्नधान्य खरेदीसाठी खर्च होत होती, त्याचे प्रमाण आता ३५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. यामुळेच जो ग्रामीण समाज शेतीवर अवलंबून आहे, त्याचे उत्पन्न फक्त १६ ते १८ टक्क्‍यांपर्यंत राहिले आहे. देशाच्या १६ टक्के उत्पन्नामध्ये ५५ टक्के समाज चरितार्थ साधत आहे. हे प्रमाण एवढे कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे आहाराच्या संदर्भातील समाजाची मानसिकता आता बदलत आहे.

आता कॅलरीज्‌ चा होतो विचार

परंपरा, खाद्य संस्कृती, जीवनशैली आणि एकूणच जगण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलत आहे. पूर्वीच्या काळी माणूस खाण्यासाठी जगत असे आणि जगण्यासाठी खात असे. आता परिस्थिती बदलली आहे. आज आहार घेताना तो ‘किती’पेक्षा ‘कसा’ घेतला जावा, यावर अधिक चर्चा होत आहे. किती जेवलो त्यापेक्षा किती कॅलरीज घेतल्या यावर विचार केला जातो आहे. आहार घेताना कर्बोदके आणि प्रथिने- ज्याला आजचा समाज कार्बोहायड्रेट आणि प्रोटिन म्हणतो, त्याचा विचार होतोय. अर्थात, आज आपल्याकडे कर्बोदके - ज्यातून भारतात दरडोई २५१७ कॅलरी ऊर्जा घेतली जाते, ती १९६१ मध्ये २०१० होती. अर्थात, आजही ती जागतिक पातळीपेक्षा कमीच आहे. जागतिक सरासरी ही २९१७ आहे. हेच प्रमाण चीनमध्ये ३१९५, तर अमेरिकेमध्ये ३७६७ आहे.

दुसरे महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणजे प्रथिने - ज्यांचे आज देशातील दरडोई प्रमाण ६३ ग्रॅम आहे तर हेच जागतिक प्रमाण ८० ग्रॅम आहे. भारतामध्ये १९६० च्या दशकात ४३ टक्के खर्च धान्य खरेदीवर होता तो आज ३२ टक्क्यांपर्यंत कमी झाला. यापूर्वी फळे- भाजीपाला खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यावर खर्च केवळ २३ टक्के होत होता, तोच खर्च आता ३४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच धान्य खरेदी आणि फळे- भाजीपाला खरेदीवरचा खर्च आता जवळपास समान झाला आहे. भारतात धान्य खरेदीवरील खर्च आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Food
Food Safety : दूषित घटकांचे आरोग्यावर परिणाम

मागील एक दशकाचाच विचार केला तर फळांचा वापर ११५ टक्के तर भाजीपाल्याचा वापर ९३ टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच कर्बोदके आणि प्रथिने यांच्यानंतर ज्या फळे- भाजीपाल्यामधून मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट्स मिळतात ती खाण्याचे प्रमाण वाढत आहे. जगातील सर्व खंडांचा विचार केला तर आशिया खंडातील सर्वांत जास्त समाज हा शाकाहारी आहे. भारताचा विचार केला तर ७७ टक्के समाज हा मांसाहारी, तर २३ टक्के समाज शाकाहारी आहे. असे असले तरीही या ७७ टक्के समाजात अनेक जण हे मांसापेक्षा अंडी, मासे या पदार्थांचे सेवन करणारे आहेत.

सुपरफूडचा जमाना

आजचा शहरी समाज - ज्याचे महिन्याचे उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त आहे; त्याचा अन्न सेवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. प्रथिनांचा विचार करत असताना प्राणिजन्य प्रथिनांपेक्षा वनस्पतिजन्य प्रथिनांची मागणी वाढत आहे. तसेच विविध प्रकारची कडधान्ये, विविध ड्रायफ्रूट्स, मशरूम, तुळशी- सब्जासारख्या बिया, टरबूज- खरबुजाच्या बिया, ग्रीन टी यांसारख्या विविध प्रकारच्या ‘सुपरफूड’कडे तो आकर्षित होत आहे.

मागील पाच वर्षांत म्हणजेच कोरोनानंतर तर याचा वापर वाढला आहे, कारण यातून मोठ्या प्रमाणात खनिजे, प्रथिने, जीवनसत्त्वे, प्रतिजैविके आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट्स मिळतात; ज्यामुळे प्रकृती निरोगी राखण्यास मदत होते. भात- गहू यांपेक्षा ज्वारी, बाजरी, नागली, राळा, भगर यांसारखी भरडधान्ये आहारात घेण्याचे प्रमाण वाढत आहे. भरडधान्यांत सर्वांत जास्त पचनीय तंतुमय पदार्थ असतात. ते पोटामधील गट बॅक्टेरियांचे प्रमाण संतुलित ठेवायला मदत करतात. तसेच त्यात ग्लुटेनचे प्रमाण कमी असल्यामुळे शारीरिक व्याधी कमी होण्यास मदत होते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भरडधान्य हे हवामान बदलामध्ये शेतकऱ्‍यांना साथ देणारे पीक आहे. आजचा ग्राहक तर हाच विचार करतो की - मी जे खातो ते कुठे, कोणी, कसे, कधी आणि केव्हा पिकविले आहे; त्यानुसार तो जास्त खर्च करायला तयार आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढत आहे. शाकाहारी समाजाकडून डाळवर्गीय पिकांचा तसेच सोयाबीनचा वापर करून प्रथिनांची गरज भागविण्याचा प्रयत्न होत आहे. मांसाहारी समाजही आज प्रथिने घेताना ती ‘स्मार्ट प्रोटिन’च्या स्वरुपात कशी मिळतील, ते बघत आहे. पचनासाठी हलका, जास्त प्रथिने आणि कमी प्रमाणात कोलेस्टेरॉल असलेला आहार निवडण्याकडे बहुतांश जणांचा कल आहे.

९८२२५१९२६०

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com