Rabi Sowing : दुष्काळी सिन्नरला रब्बीचा सर्वाधिक पेरा

Rabi Season : यंदा रब्बीचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत अद्याप २१ टक्क्यांनी कमी आहे. तो ७६.१३ टक्के आहे. जानेवारीच्या दुसऱ्या सप्ताहात ५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

Nashik News : खरीप हंगामात समाधानकारक पाऊस नसल्याने सिन्नर तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पेरणी झाली नव्हती. काही ठिकाणी पेरणी झाली मात्र पिके करपून गेल्याची गंभीर परिस्थिती होती. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करणारे हजारो पशुपालक अडचणीत सापडले होते.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन व नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसाच्या भरवशावर ज्वारी व मका पीक केले. दुष्काळी जाहीर झालेल्या सिन्नरमध्ये जिल्ह्यात रब्बीतील सर्वाधिक पेरा झाला आहे.

Rabi Season
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीचा ६० टक्के पेरा

जिल्ह्याच्या अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. ठिकाणी विहिरींना तळ गाठल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. मात्र नोव्हेंबरच्या अखेरीस झालेल्या अवेळी पावसामुळे रब्बीसाठी दिलासा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोखीम घेऊन सिन्नर तालुक्यात पेरा केल्याची परिस्थिती आहे.

यंदा रब्बीचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत अद्याप २१ टक्क्यांनी कमी आहे. तो ७६.१३ टक्के आहे. जानेवारीच्या दुसऱ्या सप्ताहात ५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. सिन्नरमध्ये सरासरीच्या तुलनेत १५० टक्क्यांनी पेरा वाढला आहे. नोव्हेंबरमध्ये अवेळी पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले, मात्र सिन्नरमध्ये अल्प नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी पाऊस रब्बीसाठी फायदेशीर ठरला.

Rabi Season
Rabi Sowing : जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा घटण्याची चिन्हे

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र (हेक्टर) टक्केवारी

मालेगाव १२,७७५ ६,९११ ५४.१

बागलाण १२,७५७ ५,३९० ४२.१५

कळवण ६,२३९ ५,५३० ८८.६४

देवळा १,९५५ ४५१ २३.०७

नांदगाव ५,३१३ २,३७१ ४४.६३

सुरगाणा ३,२४३.६८ २,४३५ ७५.०७

नाशिक ३,२७८.८४ ४,१६३.३६ १२६.९८

त्र्यंबकेश्वर १,०८४.९४ ६,५८.४ ६०.६९

दिंडोरी १०,१७५.०८ १०,७१४ १०५.३

ईगतपुरी २,६५४.७६ २,१७८.५५ ८२.०६

पेठ १,७५७.८४ ९२०.६ ५२.३७

निफाड १४,८४९.५८ ११,२७० ७ ७५.९

सिन्नर २०,६७४.८८ १९,२७६ ९३.२३

येवला ११,३२१.८ १०,६५३.४ ९४.१

चांदवड ५,४९५.६६ ३,५३९.७ ६४.४

एकूण १,१३,५७६ ८६,४६३.११ ७६.१३

पाऊस असता तर यंदा शिवारात कांदे, गहू अशी पिके दिसली असती. मात्र पाऊस नसल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न होता. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारीसारख्या पिकाची निवड केली आहे. त्यातून माणसांना खाण्यासाठी धान्य तर मिळेल शिवाय जनावरांनाही चारा मिळणार आहे.
हरिभाऊ कापसे, शेतकरी पिंपरवाडी, ता. सिन्नर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com