सोलापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून बदललेले वातावरण द्राक्षबागांसह ज्वारी, भाजीपाला पिकांसाठी पोषक ठरणार आहे. कमी झालेली थंडी विशेषतः यंदा अतिवृष्टीमुळे उशिरा फळछाटणी कराव्या लागलेल्या द्राक्षबागांच्या पथ्यावर पडणार आहे. मात्र हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे..जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना सलग तिसऱ्या वर्षी संकटाला सामोरे जावे लागले. अतिवृष्टीमुळे झालेले बागांचे नुकसान व उत्पादनात ५० टक्के घट झालेले असताना वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते..Climate Change Impact: ढगाळ वातावरणाचा जिल्ह्यात रब्बी पिकांवर परिणाम.कारण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील किमान तापमान ९.८७ अंश सेल्सिअस इतके खाली गेले होते. परिणामी द्राक्ष घडांच्या वाढीचा वेग ५-६ दिवसांनी मंदावला होता. त्यामुळे यंदा फळ परिपक्व होण्यास लागणारा कालावधी आठवडाभर पुढे जाईल..Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीचा पशुधनावर परिणाम.नव्या वर्षात एक जानेवारीपासून किमान तापमानात ३.३८ अंश सेल्सिअसने वाढ होत १३.२५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. तर सोमवारी किमान तापमान १४.८ अंश होते. थंडी कमी झाल्याने द्राक्षघड वाढीस पोषक ठरणार आहे. विशेषतः अतिवृष्टीमुळे द्राक्षबागांच्या फळछाटण्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालल्या. त्या बागांसाठी हे वातावरण लाभदायी आहे. कारण ढगाळ वातावरणामुळे घडांची वाढ नियमित होईल..दाणे भरण्यास मदतढगाळ वातावरण ज्वारी, गहू पिकांचे दाणे भरण्यास उपयुक्त असते. लवकर पेरणी झालेली ज्वारी कणीस निसवण्याच्या मार्गावर आहे. गव्हाच्या कणसांत दाणे भरण्यास हे वातावरण फायदेशीर ठरणार आहे. भाजीपाला पिकांनाही पोषक आहे. मात्र, हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.