Dairy Production : कोल्हापुरातील अनेक दूध संस्थांचे ‘मापात पाप’

Milk Rate : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक तालुक्यांमध्ये दूध संस्थांच्या वजन काट्यांची तपासणी करण्यात येत आहे.
Milk Rate
Milk Rate Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक तालुक्यांमध्ये दूध संस्थांच्या वजन काट्यांची तपासणी करण्यात येत आहे. यात अनेक संस्था दोषी ठरल्या आहेत. प्राथमिक दूध संस्थांत दहा लिटर दुधाच्या मापात किमान ५०० ते ७०० मिलिची फसवणूक उघड झाली आहे. वजन काट्यात फेरफार करून ही फसवणूक होत आहे, असा दावा शासन नियुक्त समितीचे सदस्य रूपेश पाटील यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेड, आंदोलन अंकुश आदी संस्थांनी वजन काटा तपासणीबाबत आंदोलन केल्यानंतर ही तपासणी मोहीम तीव्र झाली आहे. दूध संस्थांमधील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर दुधाचे मोजमाप अचूक व्हावे, यासाठी संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रूपेश पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरसह राज्यभरातील दुधाचे मोजमाप करणारे इलेक्ट्रॉनिक वजनकाटे तपासणी करण्यासाठी शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे पाटील सदस्य आहेत.

Milk Rate
Cow Milk Rate : गाय दूधाचे ५ रुपये अनुदान अटी शर्थीत अडकणार, शेतकरी राहणार वंचीत

करवीर व पन्हाळा तालुक्यातील दूध संस्थांमधील तपासणीदरम्यान भामटे, मरळी, सुळे व मल्हारपेठ या गावांतील १४ दूध संस्थांमधील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची तपासणी केली. यापैकी १२ दूध संस्थांमधील काट्यांमध्ये अचूकता १०० मिलि प्रमाणात ठेवणे, कन्व्हर्जन फॅक्टर बदलून फसवणूक करणे, वजनकाट्यांची सील तोडून त्यात अनधिकृत बदल करणे यासह काटा दहा मिलि अचूकतेचा वापरणे पण १० ते ९० मिलि दुधाचा मोबदला उत्पादकांना न देणे अशा गंभीर चुका आढळून आल्या. यातून उत्पादकांचे दहा लिटरला ७०० मिलि ते एक लिटर जादा दूध बिनमापी जात असल्याचा दावा पाटील यांनी केला.

या संस्थांमध्ये दुधाचे फॅट सॅम्पल तपासणीत ५० मिलि इतके दूध घेत आहेत. काही संस्था एसएनएफ तपासत नसल्याचे आढळून आले. दुग्ध विकास विभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे.

Milk Rate
Cow Milk Rate : महिनाभराच्या पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशासाठी ?

या तपासणी मोहिमेत ‘वैधमापनशास्त्र’चे उपनियंत्रक दत्तात्रेय पवार, निरीक्षक ए. टी. पाटील यांच्यासह दुग्ध विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले. तर संभाजी ब्रिगेडकडून श्री. पाटील यांच्यासह अभिजित कांजर, शिवाजी गुरव, राहुल पाटील, सरदार पाटील, कार्तिक पाटील आदी उपस्थित होते.

शिरोळमधील ‘त्या’ संस्थांना नोटिसा

शिरोळ तालुक्यात त्रुटी आढळलेल्या ‘त्या’ दूध संस्थांना कामकाज सुधारण्याच्या व खुलासा सादर करण्याच्या नोटिसा दिल्याची माहिती आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्वच दूध संस्थांना दहा मिलिचे अचूक काटे वापरण्याचे व त्या काट्यांवर येणारे वजन उत्पादकांच्या वहीत लिहिले पाहिजे, उत्पादकांच्या वहीत फॅट एसएनएफ लिहून त्यानुसार दुधाचे बिल द्यावे, वीस मिलिपेक्षा जास्त दूध फॅट काढण्यासाठी घेऊ नये, या महत्त्वाच्या सूचना दुग्ध विकास विभागाने केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com