BJP News : अकोला भाजपमध्ये अध्यक्षपदाच्या खांदेपालटाचे वारे वेगात

BJP Organizational Structure : भाजपच्या संघटनात्मक बांधणीची प्रक्रिया सुरू झालेली असून जिल्हा तसेच शहरांसाठी अध्यक्ष निवडले जाणार आहेत.
BJP
BJPAgrowon
Published on
Updated on

BJP Akola News : भाजपच्या संघटनात्मक बांधणीची प्रक्रिया सुरू झालेली असून जिल्हा तसेच शहरांसाठी अध्यक्ष निवडले जाणार आहेत. भाजप कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत महानगराध्यक्षपदासाठी विजय अग्रवाल यांच्या नावावर सहमती झाल्याने ते पदावर कायम राहणार हे निश्चित झाले.

जिल्हाध्यक्षपदासाठी सर्वांनी एकमताने गणेश अंधारे यांचे नाव पुढे केले. याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ही दोनच नावे अंतिम होण्याची चर्चा आहे.

BJP
Bjp Gawat: 'भाजप' गवतामुळे शेतकरी वैतागले!

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांची प्रदेश कार्यकारीत सरचिटणीसपदी वर्णी लागली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदावर नवीन व्यक्तीला संधी मिळणार आहे. यासाठी पक्षातील काही दिग्गजांची नावे चर्चेत होती.

मात्र, भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत गणेश अंधारे यांचे नाव पुढे करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. अंधारे हे आ. सावरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात.

म्हणूनच सावरकरांचे वारसदार म्हणून जिल्हाध्यक्ष पदासाठी सर्व सहमतीने अंधारे यांना पसंती देण्यात आली. त्यासोबतच विजय अग्रवाल यांच्या नावालाही बहुमताने सहमती देण्यात आली.

या बैठकीला विदर्भ विभाग संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठीकर तसेच प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, आ. हरीश पिंपळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, अनुप धोत्रे, माजी आ. नारायण गव्हाणकर, ॲड. मोतीसिंग मोहता, विजय मालोकार, सिद्धार्थ शर्मा, श्रावण इंगळे, गिरीश जोशी, माधव मानकर, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. किशोर मालोकार, शंकरराव वाकोडे, तसेच मंडळ अध्यक्ष, मोर्चा, आघाडी सेलचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com