Team Agrowon
गेल्या 15 दिवसांपूर्वी अहमदनगर, शेवगाव, पाथर्डी, शिरूर कासार, बीड, केज, जामखेड, आष्टी असा दौरा झाला...
या दौऱ्यात सर्वत्र एक बाब निदर्शनास आली ती म्हणजे शेतीच्या बांधावरच नाही, तर शेतात देखील भाजप (चिमुक काटा) गवताचा जास्त प्रमाणात झालेला फैलाव....(पहा फोटो).
या संदर्भात अनेक शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली... सर्वजण या गवताला "भाजप गवत" याच नावाने ओळखत असल्याचे दिसून आले.
या गवताला "भाजप गवत" का म्हणतात हा प्रश्न मला पडला ? या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलणे झाले. शेतकऱ्यांकडून "आम्ही भाजप गवत असेच म्हणतो, याच नावाने ओळखतो" असे उत्तर मिळाले.
एका अर्थाने या विदेशी गवताला शेतकऱ्यांनी नवीन ओळख दिली असल्याचे दिसून आले. भाजप गवताची ओळख ही अलीकडची नाही तर गेल्या तीन-चार दशकांपासून आहे.
पण अलीकडे मोठ्या प्रमाणावर बांधावर , शेतात आणि मोकळ्या जागेवर वाढ झाल्याने हे गवत सर्वत्र चर्चेला येते.