Solapur-Tuljapur Highway : सोलापूर-तुळजापूर मार्गावरील वाहतूक मार्गात बदल

Traffic Route Change : कोजागिरी पौर्णिमेसाठी सोलापूरमार्गे मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूरकडे पायी चालत जातात. त्यामुळे २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरला सोलापूर ते तुळजापूर या महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
Solapur Tuljapur Highway
Solapur Tuljapur HighwayAgrowon
Published on
Updated on

Solapur News : येत्या शनिवारी (ता. २८) कोजागिरी पौर्णिमेसाठी सोलापूरमार्गे मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूरकडे पायी चालत जातात. त्यामुळे २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सोलापूर ते तुळजापूर या महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव १५ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत साजरा होत आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर शहर, सोलापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरकडे पायी चालत जातात.

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या करिता भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Solapur Tuljapur Highway
Abdul Sattar : शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे अब्दुल सत्तारांचे आदेश

प्रामुख्याने शुक्रवारी (ता. २६) रात्री बारावाजलेपासून २९ ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत तुळजापूर ते सोलापूर व तुळजापूर ते बार्शी येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जारी केले आहेत

या कालावधीत तुळजापूर ते सोलापूर व तुळजापूर ते बार्शी या मार्गावर पोलीस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व एस. टी. बसेस वगळून सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात आलेली आहे.

तसेच २६ ऑक्टोबर रात्री बारा वाजलेपासून २९ ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत तुळजापूर घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार आहे, असेही सांगण्यात आले आहे

Solapur Tuljapur Highway
Sugarcane FRP : उसाला दुसरा हफ्ता ४०० द्या, भाजपची साखर आयुक्तांकडे मागणी

मनाई करण्यात आलेला मार्ग

तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीस तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. तसेच सोलापूर ते तुळजापूरकडे जाणा-या वाहतुकीसही सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर दरम्यान वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

त्याशिवाय तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहतुकीसही तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी या दरम्यान मनाई आहे. तसेच बार्शी ते तुळजापूर कडे जाणाऱ्या वाहतुकीस बार्शी, गौडगाव, ढेकरी, तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.

परवानगी असलेला मार्ग

तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतूक मंगरूळपाटी, इटकळ, बोरामणी पुढे सोलापूर या मार्गे सुरु राहील. सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतूक सोलापूरपासून बोरामणी, इटकळ, मंगरूळपाटी पुढे तुळजापूर या मार्गे सुरु राहील.

तुळजापूर ते बार्शीकडे येणारी वाहतूक तुळजापूर, धाराशिव, वैराग पुढे बार्शी या मार्गे राहिली. बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहतूक बार्शी, वैराग, धाराशिव पुढे तुळजापूर या मार्गे सुरु राहिली. धाराशिव ते सोलापूर कडे येणारी वाहतूक वैराग मार्गे सुरू राहील. सोलापूर ते धाराशिवकडे जाणारी वाहतूक वैराग मार्गे पुढे जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com