Water Issue : चांदवडचे सर्वपक्षीय नेते पाणीप्रश्नी एकाच व्यासपीठावर

Water Crisis : नार-पार प्रकल्पाला मंजुरी मिळाली अन् खानदेशात आनंदाचे वातावरण पसरले. संयुक्त असणाऱ्या चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघातील देवळा तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नार-पार प्रकल्पाला मंजुरी मिळाली अन् खानदेशात आनंदाचे वातावरण पसरले. संयुक्त असणाऱ्या चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघातील देवळा तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला. मात्र, चांदवडचे काय, हा प्रश्न अनुत्तरित राहिला.

या प्रश्नाने चांदवडकरांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाल्याने काही तरुणांच्या पुढाकाराने चांदवड येथे पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. यानिमित्त सर्वपक्षीय एकाच व्यासपीठावर आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.

Water Crisis
water Crisis : एकरुखच्या पाण्यासाठी निघणार ७२ गावांतून रथयात्रा

या बैठकीत तालुक्याला संजीवनी ठरणारा हतियाड, काळडोह, तापी खोऱ्यात येणाऱ्या चांदवड तालुक्यातील गावांना नार-पारचा फायदा किती? पूर्व भागातील काही गावांना राहुड धरणातील पूर पाणी देण्यासाठी पाटचारी का होत नाही? आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यासाठी संबंधित नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

यावर डॉ. राहुल आहेर म्हणाले, की नार-पार प्रकल्पाचे नियोजन तापी खोरे करत असून चांदवडसाठी पार गोदावरी प्रकल्पातून पाणी आणण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. याबरोबरच पार तापी योजनेलाही मान्यता मिळालेली असून या योजनेतून धोडंबे ते खोकड तलावापर्यंत हायराइज कॅनालने पाणी आणण्यात येणार आहे. हाथियाडसाठी प्रयत्न करून येत्या दोन महिन्यांत प्रशासकीय मान्यता आणली जाईल, तसेच चांदवडच्या पाणी प्रश्नासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या समवेत राहीन व पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जाईल.

Water Crisis
Water Crisis : तीन महिने उलटूनही प्रकल्प कोरडेच

या वेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे, नितीन आहेर, संजय जाधव, भूषण कासलीवाल, रघुनाथ आहेर, विजय जाधव, विजय कुंभार्डे, संपतराव वक्ते, प्रभाकर ठाकरे, हिरामण महाले, शांताराम ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीत विकास भुजाडे, विलास भवर, पंकज दखणे, शांताराम भवर, अनिल काळे, समाधान जामदार, मनोज शिंदे, अभिषेक चौधरी, रावसाहेव भालेराव, बाळासाहेब गाळे, कैलास कोतवाल, अनिल कोतवाल आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. या बैठकीत संघर्ष समिती स्थापण्याची भूमिका घेतली असून पाण्यासाठीचा लढा तीव्र करण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्वागत अक्षय माकुणे यांनी केले. तर सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले.

माजी आमदार कोतवाल यांनी उपस्थित केले सवाल

२०१४ व २०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, नारपार होणारच मग अजूनही दहा वर्षात ही योजना पूर्ण का झाली नाही?

मांजरपाडा-१ प्रकल्प झाला तर मांजरपाडा-२ प्रकल्पदेखील व्हायला हवा होता, तो अजूनही का झाला नाही?

हाथियाड धरणाची तांत्रिक मान्यता २०१४ पूर्वीच मिळालेली आहे;मग दहा वर्षात अजूनही या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद का केली नाही?

आमदार डॉ. राहुल आहेर यांनी हे प्रश्न दहा वर्षांत सत्तेत असताना मार्गी लावायला हवे होते, ते अजूनही मार्गी का लावले नाहीत?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com