Kolhapur News : शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनासाठी आधुनिक शेती तंत्राचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण महत्त्वाचे ठरते. ही सोय स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, यासाठी चंदगड तालुका शेतकरी सहकारी संघामार्फत माती परीक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय आमदार राजेश पाटील यांनी जाहीर केला. संस्थेच्या वार्षिक सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ६७ लाख ५० हजार रुपये नफा झाला असून, पंधरा टक्के लाभांश जाहीर केला. मात्र, सभासदांनी त्याऐवजी चार लीटर गोडेतेलाची मागणी केली. त्यावर चर्चा होऊन तीन लीटर तेल देण्याचे ठरले.
कर्मचाऱ्यांच्या पगारात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला. माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांचे स्मारक केवळ पुतळास्वरूपी न करता समाजासाठी उपयुक्त इमारत बांधकाम करण्याचा मानस असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. अहवालामध्ये कै. सौदामिनी पाटील यांचाही फोटो वापरावा, अशी मागणी केली.
संस्थेमार्फत सीएनजी पंप, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, काजू मुरट्यावर प्रक्रिया उद्योग, पशुखाद्यनिर्मिती प्रकल्प उभारून उत्पन्न वाढीबाबत चर्चा झाली. पांडुरंग बेनके, सूर्यकांत पाटील, सुनील पवार, नंदकुमार गावडे, विष्णू आडाव, कलाप्पा देसाई, रघुनाथ कांबळे, विनोद पाटील, आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
स्पर्धा परीक्षेतून विविध पदांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष तानाजी गडकरी, अभय देसाई, बाळासाहेब घोडके, विठोबा गावडे, आदी उपस्थित होते. व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी स्वागत करून अहवाल वाचन केले. जानबा चौगुले यांनी आभार मानले. आर. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.