Cotton Cultivation : खानदेशात कापूस लागवडीत घट शक्य

Cotton Production : खानदेशात सलग दुसऱ्या वर्षी कापूस लागवडीत घट होणार आहे. एकूण लागवड आठ लाख ३० हजार हेक्टरवर होईल, असा अंदाज आहे.
Cotton
CottonAgrowon

Jalgaon News : खानदेशात सलग दुसऱ्या वर्षी कापूस लागवडीत घट होणार आहे. एकूण लागवड आठ लाख ३० हजार हेक्टरवर होईल, असा अंदाज आहे. यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टरवर कापूस पीक राहण्याची शक्यता आहे.

Cotton
Cotton Procurement : ‘सीसीआय’ची ६८ हजार, तर खासगी ११ लाख क्विंटल खरेदी

सर्वाधिक कापूस लागवडीच्या मालिकेत जळगाव यंदाही राज्यात पुढे राहण्याची शक्यता आहे. मात्र खानदेशातील लागवडीचा विचार करता जळगावसह धुळे व नंदुरबारात सलग दुसऱ्या वर्षी कापूस लागवड कमी होईल.

जळगाव जिल्ह्यात २०२२ मध्ये पाच लाख ६७ हजार हेक्टरवर, २०२३ मध्ये पाच लाख ५४ हजार हेक्टरवर कापूस होता. यंदा ही लागवड सुमारे चार हजार हेक्टरने कमी होऊन साडेपाच लाख हेक्टरवर पोहोचेल, असा अंदाज आहे.

Cotton
Cotton Rate : परभणी जिल्ह्यात कापूस दरात घट

२०२२ मध्ये खानदेशात कापसाची लागवड आठ लाख ७० हजार हेक्टरवर, तर २०२३ मध्ये ती साडेआठ लाख हेक्टरवर झाली. यंदा ही लागवड आठ लाख ३० हजार हेक्टरवर होऊ शकते. धुळ्यात सुमारे एक लाख ८५ हजार हेक्टरवर, नंदुरबारात सुमारे ९५ हजार हेक्टरवर कापूस लागवड होईल.

सततच्या नुकसानीने पीक बदलाचे नियोजन

कापूस पिकात कुठलाही नफा नाही. सतत नुकसान येत आहे. गुलाबी बोंड अळी व मजूरटंचाई, कमी दर अशी समस्या आहे. यामुळे कापूस पिकाऐवजी सोयाबीनकडे अनेक कोरडवाहू शेतकरी वळतील, असे दिसते. तर ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे मुबलक आहेत, त्यातील अनेक शेतकऱ्यांनी पपई, केळीला पसंती दिली आहे. काहींनी क्षेत्र कमी करण्याचे नियोजन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com