Sand Mining : वाळू उपसा रोखण्याचे यंत्रणेसमोर आव्हान

Illegal storage of sand : वाळूचा अवैधरीत्या साठा आणि उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी महसूल यंत्रणेपुढेच आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
Sand Mining
Sand MiningAgrowon

Ghansangvi News : वाळूचा अवैधरीत्या साठा आणि उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी महसूल यंत्रणेपुढेच आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

घनसावंगी तालुक्‍यातील गोदावरी नदीच्या काठच्या व दुधना नदी काठच्या गावांत वाळू उपसा करून ती गावात आपल्या शेतातील गोठ्यात, गायरानसह मिळेल त्या जागेवर टाकायची व नंतर वाळू वाहतूक करणाऱ्या माफीयांशी संपर्क साधून ती दररोज रात्री भरून द्यायची. भरून दिल्यानंतर ज्या ठिकाणी न्यायची तेथपर्यंत जबाबदारी संबंधितांवर.

Sand Mining
Illegal Sand Mining : अवैध वाळूउपशा विरोधात ‘महसूल’ची कारवाई जोरात

त्याचबरोबर या गावांतील अनेक जण वाहने खरेदी करून या व्यवसायात उतरले आहेत. प्रशासनाकडून वाळू साठे जप्त करून नंतर लिलाव करण्यात आला तरी हे अवैध वाळू साठे करणे आणि उपसा थांबलेला नाही. प्रशासनाने अनेकवेळा संबंधित वाहनांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र प्रशासनाकडे वाळू वाहतूक रोखण्यासाठी तुटपुंजे कर्मचारी आहेत. या वाळू माफीयांच्या पुढे पोलिस व तहसील प्रशासनाची व्हॅन तग धरू शकत नसल्याने वाळू उपसा व वाहतूक थांबलेली नाही.

अनेक कारणांवरून लिलावास विरोध

पाण्याची पातळी कमी होण्याची शक्‍यता, पाणी पुरवठा योजनेस पाणी कमी पडते, जनावरांना व शेतीला पाण्याचे दुर्भीष निर्माण होणे, रस्त्यांवर ये-जा सुरू असते त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. रस्ता वाहतुकीमुळे खराब होतो या कारणाने अनेक ग्रामपंचायतींनी या वाळू पट्ट्यांचा लिलाव करण्यास असहमती दर्शवली आहे.

Sand Mining
Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

लोकांना दिसते, अधिकाऱ्यांना?

दरवर्षी वाळू उपसा करून लिलाव घेण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असते. त्यामुळे रात्रंदिवस वाळू उपसा वाळूसाठे करण्यावर वाळूसम्राटांनी जोर लावला आहे. तालुक्‍यात एकाही वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसून हा अवैध उपसा नागरिकांना दिसतो मग प्रशासनास का दिसत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तालुक्‍यातील वाळू घाटांचा अद्याप लिलाव झालेला नाही. त्यामुळे वाळू उपसा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी होणाऱ्या वाळूच्या अवैध उपशाबद्दल तसेच ग्रामीण भागात असलेल्या वाळूसाठ्यांबद्दल तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील. त्याचबरोबर या वाळू पट्ट्यात होणाऱ्या उपशाबद्दल तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल.
योगीता खटावकर, तहसीलदार घनसावंगी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com