Market Committee Update : येवला, चांदवड येथे महाविकास आघाडीचे सभापती

Chairman of the Market Committee : मंगळवारी (ता. २३) येवला, चांदवड बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडी झाल्या.
Chairman of Market Committee
Chairman of Market Committee Agrowon
Published on
Updated on

Market Committee In Nashik : मंगळवारी (ता. २३) येवला, चांदवड बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडी झाल्या. या तिन्ही ठिकाणी महविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांना सभापतिपदी संधी मिळाली.

येवला येथे सभापतिपदी किसन धनगे, चांदवड येथे सभापतिपदी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव तर देवळा येथे सभापतिपदी शेतकरी विकास पॅनेलचे योगेश शांताराम आहेर यांना संधी मिळाली. सत्तांतर झाल्याने चांदवड व देवळा येथे भाजपची सत्ता खालसा झाली.

येवला येथे सभापतिपदी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक किसन धनगे यांना तर उपसभापतिपदावर शिवसेना नेते संभाजी पवार याचे कट्टर समर्थक अॅड. बापूसाहेब गायकवाड यांना संधी दिली. या वेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शिवसेना नेते संभाजी पवार, वसंत पवार, मकरंद सोनवणे उपस्थित होते.

Chairman of Market Committee
Chalisgaon APMC Result : चाळीसगाव बाजार समिती सभापतिपदासाठी चुरस

चांदवड बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय दगुजी जाधव यांची तर उपसभापतिपदी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कारभारी आहेर यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.

सभापतिपदासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. जाधव यांचा तर विरोधी गटातर्फे पंढरीनाथ खताळ यांचा अर्ज दाखल झाला होता. तसेच उपसभापतिपदासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे श्री. आहेर तर प्रतिस्पर्धी गटातर्फे सुखदेव जाधव यांचा अर्ज दाखल झाला.

मात्र, त्यानंतर विरोधी गटाच्या दोन्ही संचालकांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. शिरीषकुमार कोतवाल, डॉ. सयाजीराव गायकवाड, नितीन आहेर, डॉ. राजेंद्र दवंडे, विक्रमबाबा मार्कंड, सचिन अग्रवाल, डॉ. वैशाली जाधव, मीनाताई शिरसाट, गणेश निंबाळकर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, वाल्मीक वानखेडे, योगेश ढोमसे, रवींद्र पवार, सुशील पलोड उपस्थित होते.

देवळा बाजार समितीच्या सभापतिपदी शेतकरी विकास पॅनेलचे योगेश शांताराम आहेर यांची तर उपसभापतिपदी अभिमन पवार यांची बिनविरोध निवड झाली. सभापतिपदासाठी सूचक म्हणून भाऊसाहेब पगार यांनी, तर अनुमोदक म्हणून धनश्री आहेर यांनी स्वाक्षरी केली.

तसेच, उपसभापतिपदासाठी सूचक म्हणून दिलीप पाटील, तर अनुमोदक म्हणून शाहू शिरसाट यांनी स्वाक्षरी केली. पॅनेलचे नेते केदा आहेर, संचालक विजय सोनवणे, शिवाजी पवार, शिवाजी आहिरे, अभिजित निकम, विशाखा पवार, दीपक बच्छाव, रेश्मा महाजन, भास्कर माळी, शीतल गुंजाळ, संजय शिंदे, निंबा धामणे, भावराव नवले, सचिव माणिक निकम आदी उपस्थित होते.

Chairman of Market Committee
Sangli Market Committee Update : सांगली बाजार समिती सभापती निवड २५ मे रोजी

लासलगाव बाजार समिती सभापतिपदी क्षीरसागर

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव बाजार समितीत निवडून आलेल्या दोन्ही गटांना एकत्र करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभापतिपदाची संधी दिली. तर दुसऱ्या गटाचे तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापतिपदाची संधी दिली.

आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समिती निवडणुकीत दोनही गटांना समसमान ९ जागा मिळाल्या. त्यामुळे या बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com