Soybean Procurement: महाराष्ट्रातून १८ लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी
Shivraj Singh Chouhan: केंद्र सरकारने महाराष्ट्रातून हमीभावाने १८ लाख ५० हजार टन सोयाबीन खरेदीस मंजुरी दिली असून यासाठी तब्बल ९,८६० कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला आहे. तसेच राज्यातील मूग आणि उडीद खरेदीलाही परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.