Indian Agriculture: देशातील खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र १ हजार १०४.४६ लाख हेक्टर असून, त्यापैकी जवळपास ९६ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. २१ ऑगस्टपर्यंत देशात १ हजार ५६.७० लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १ हजार ७२.७७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रातील तूट अवघी ०.३ टक्क्यावर आली आहे. .पेरणीचा कालावधी संपत आल्याने १५ ते २१ ऑगस्टदरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. ऑगस्टच्या सुरुवातीला पेरणीतील तूट अधिक होती. ७ ऑगस्टपर्यंत गत वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्र सुमारे दोन टक्क्यांनी कमी होती. मात्र १५ ते २१ ऑगस्ट या एका आठवड्यात शेतकऱ्यांनी ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी केली. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ३५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे पेरणी क्षेत्रातील तूट झपाट्याने कमी झाली..Kharif Sowing: मराठवाड्यात सरासरी क्षेत्राच्या ९३ टक्के पेरणी.भाताचे क्षेत्र १३ लाख हेक्टरने कमीप्रमुख खरीप पीक असलेल्या भाताच्या क्षेत्रात मात्र घट कायम आहे. २१ ऑगस्टपर्यंत भाताची लागवड ४०५.१० लाख हेक्टरवर झाली. गेल्या वर्षी याच काळात ती ४१८.२९ लाख हेक्टर होती. म्हणजेच भाताचे क्षेत्र १३.१९ लाख हेक्टरने, अर्थात ३.२ टक्क्यांनी घटले आहे. ७ ऑगस्टपर्यंत ही तूट ४.४ टक्के होती. गेल्या दोन आठवड्यांत भात लागवडीला वेग आल्याने ही तूट काही प्रमाणात भरून निघाली आहे. केंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी १२३.१५ दशलक्ष टन भात उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. भात क्षेत्रातील घटीमध्ये मध्य प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि झारखंड या राज्यांचा मोठा वाटा आहे. कर्नाटकात सर्वाधिक ३.०९ लाख हेक्टर, तेलंगणात २.४५ लाख, झारखंडमध्ये १.८८ लाख, मध्य प्रदेशात १.७५ लाख, ओडिशात १.६३ लाख, तर महाराष्ट्रात १.५० लाख हेक्टरने भात क्षेत्र घटले आहे..कडधान्य क्षेत्रात वाढकडधान्यांची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा वाढली आहे. सर्व कडधान्यांचे क्षेत्र ११३.६३ लाख हेक्टरवर पोहोचले असून, गेल्या वर्षी ते ११२.१४ लाख हेक्टर होते. तुरीचे क्षेत्र ४३.४४ लाख हेक्टरवरून ४३.८६ लाख हेक्टर, तर उडदाचे क्षेत्र २१.७२ लाख हेक्टरवरून २४.३८ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मुगाचे क्षेत्र मात्र ३३.९३ लाख हेक्टरवरून ३२.६८ लाख हेक्टरपर्यंत कमी झाले आहे..Kharif Sowing: ऑगस्टच्या पावसाने पेरण्यांचा टक्का वाढला.सोयाबीन, मक्याचे क्षेत्र घटलेतेलबियांचे एकूण क्षेत्र किरकोळ घटून १८८.३७ लाख हेक्टर झाले. गेल्या वर्षी ते १८८.६९ लाख हेक्टर होते. सोयाबीनची पेरणी गेल्या वर्षीच्या १२२.७६ लाख हेक्टरवरून १२१.३५ लाख हेक्टरपर्यंत कमी झाली. भुईमुगाचे क्षेत्र मात्र ४८.२२ लाख हेक्टरवरून ४८.७९ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे..भरडधान्यांचे क्षेत्र १.९ टक्क्याने घटून १७६.३६ लाख हेक्टर झाले. मक्याचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या ९३.३० लाख हेक्टरवरून ८९.५१ लाख हेक्टरपर्यंत कमी झाले. ज्वारीचे क्षेत्र १२.६१ लाख हेक्टरवरून १३.४१ लाख हेक्टर आणि बाजरीचे क्षेत्र ६३.३३ लाख हेक्टरवरून ६४.६८ लाख हेक्टरपर्यंत वाढले. नाचणीचे क्षेत्र मात्र ६.६० लाख हेक्टरवरून ४.८१ लाख हेक्टरपर्यंत घटले आहे..कापसाचे क्षेत्रही किंचित घटले आहे. गेल्या वर्षी २१ ऑगस्टपर्यंत १०८.७३ लाख हेक्टरवर कापूस होता. यंदा हे क्षेत्र १०८.४५ लाख हेक्टर आहे. ताग आणि मेस्ताचे क्षेत्र मात्र ६.२३ लाख हेक्टरवरून ६.३४ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे..खरीप पेरणीचा लेखाजोखापीक २०२५ (लाख हेक्टर) २०२६ (लाख हेक्टर) बदलभात ४१८.२९ ४०५.१० -३.२ टक्केकडधान्ये ११२.१४ ११३.६३ +१.३ टक्काभरडधान्ये १७९.८१ १७६.३६ -१.९ टक्कातेलबिया १८८.६९ १८८.३७ -०.२ टक्काऊस ५८.८७ ५८.४४ -०.३ टक्काकापूस १०८.७३ १०८.४५ -०.७ टक्काएकूण खरीप १,०७२.७७ १,०५६.७० -०.३ टक्का.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.