Sulfur Coated Urea : सल्फर कोटेड युरियात केंद्राची काटामारी; किंमत तीच वजन मात्र घटवले

Sulfur Coated Urea Market Price : सल्फर कोटेड युरिया बाजारात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारकडून याला मान्यता दिली असून त्यांच्या किंमतीत कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र थेट वजनातच सरकारकडून काटामारी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Sulfur Coated Urea
Sulfur Coated Urea Agrowon

Pune News : गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांना युरिया मिळण्यात अडचणी येत होत्या. तर सल्फर कोटेड युरिया बाजारात आणावी असा प्रस्ताव केंद्र सरकारला देण्यात आला होता. त्यावर सरकारने मंजुरी देताना किंमतीही निश्चित केली आहे. याबाबत रसायन आणि खते मंत्रालयाच्या खत विभागाने माहिती दिली आहे. तसेच या विभागाने खत उत्पादक कंपन्यांना नव्या युरिया पोत्याची किंमत जीएसटीसह २६६.५० रुपये असावी असे निर्देश दिले आहेत. पण थेट वजनातच सरकारकडून काटामारी करण्यात आली आहे.

अर्थ व्यवहाराशी निगडीत कॅबिनेट समितीने (CCEA) २८ जून २०२३ रोजीच सल्फर कोटेड युरियाला युरिया गोल्ड नावाने मान्यता दिली होती. आता सल्फर कोटेड युरियाची विक्री ४० किलोच्या पिशव्यांमधून होणार असून त्याची किंमत ही २६६.५० रुपये इतकीच असणार आहे. याच्याआधी ही पिशवी 45 किलोची होती.

थेट वजनात काटामारी कशी

सल्फर कोटेड युरिया गोल्ड ही युरिया आता नव्या निर्देशानुसार ४० किलोच्या पिशवीत येणार आहे. पण सध्याची नीम कोटेड यूरिया ही ४५ किलो वजनाची होती. तर याची किंमत ही जीएसटीसह २६६.५० रुपये इतकी आहे. तर नव्या सल्फर कोटेड यूरिया गोल्डची किंमतीत बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र वजनात ५ किलोचा फरक पडलेला आहे. त्यामुळे तिच किंमत मात्र वजनात पाप सरकारने केले आहे. त्यामुळे एकिकडे शेतकऱ्यांना ५ किलो युरियाचा फटका बसणार आहे.

सल्फर कोटेड युरिया म्हणजे काय?

सल्फर कोटेड यूरियामध्ये नायट्रोजनसह सल्फर असते. यूरियावर सल्फरचा कोट असतो. त्यामुळे पिकाला सल्फरची मात्रा मिळण्यासह रोगांपासून संरक्षण करते. पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

Sulfur Coated Urea
Urea Shortage : अकोल्यात शोधाशोध करूनही युरिया मिळेना

आवश्यक पोषक तत्वांपैकी एक

सल्फर पिकाला लागणाऱ्या आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. मात्र याकडे शेतकरी लक्ष देत नाहीत. त्यामुळेच शेतजमिनीत देखील याची कमतरता वाढत जाते. ती सध्या 40 टक्के आहे.

तेलबिया पिकांसाठी अत्यंत महत्वाचे

तेलबिया पिकांसाठी सल्फर (गंधक) हे अत्यंत महत्वाचे असते. नायट्रोजन, स्फुरद, पोटॅश, सल्फर झिंक आणि बोरॉन हे तेलबिया पिकांसाठी गरजेचे असतात. त्यावरच शेतकरी भर देतात. मात्र सल्फर, झिंक आणि लोह याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळेच आता हा बद करण्यात आला असून सल्फर कोटेड यूरिया बनविण्यात आली आहे. ज्यामुळे सल्फरची कमतरता दूर होण्यास मदत होईल.

Sulfur Coated Urea
Onion Damage : समाजकंटकाने युरिया टाकल्याने चाळीतील ४५ ट्रॉली कांदा खराब

यूरिया गोल्डचे फायदे

युरियाच्या साहाय्याने शेतात नायट्रोजनची पुरेशी मात्रा दिली जाते. ज्यामुळे उत्पादनात वाढ होते. सामान्य युरियाच्या माध्यमातून हे साध्य होत आहे. पण यूरिया गोल्ड वापरल्यास नायट्रोजनची क्षमता वाढण्यास मदत होते.

युरियाचा तोटा

सध्या उत्पादन वाढवण्याच्या नादात शेतकऱ्यांकडून युरियाचा वापर वाढला आहे. ज्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून त्याचा उत्पादनावर थेट परिणाम होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com