Sugar Market : केंद्र शासन गोळा करतेय साखर व्यापाऱ्यांची माहिती

Sugar Industry : देशातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांकडून साखर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिले आहेत.
Sugar Market
Sugar MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांकडून साखर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिले आहेत.

केंद्रीय साखर व खाद्यतेल संचालनालयाचे कक्ष अधिकारी सुधीर यादव यांनी देशातील सर्व साखर कारखान्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच व्यवस्थापकीय संचालकांना एक तातडीचे पत्र पाठविले आहे. ‘‘केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने आम्हाला आठ सप्टेंबर २०२३ रोजी पत्र पाठविले आहे.

Sugar Market
Sugar Market : व्यापार विवाद सोडविण्यासाठी भारत-ब्राझीलमध्ये बोलणी सुरू

त्यानुसार देशातील साखर कारखान्यांकडून साखर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांची यापूर्वी मागविण्यात आलेली माहिती अद्यापही अनेक कारखान्यांकडून पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळे यापूर्वी दिलेल्या प्रपत्रांमध्ये तातडीने माहिती द्यावी,’’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांची माहिती केंद्राला लवकर मिळण्यासाठी साखर उद्योगातील संघटनांची मदत घ्या, असा आदेश अन्न मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे केंद्रीय साखर संचालनालयाने इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघ, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशन यांनाही पत्र पाठविले आहे.

‘‘केंद्राकडे खासगी व सहकारी साखर कारखान्यांची तपशीलवार माहिती अद्ययावतपणे उपलब्ध असते. साखरेची उपलब्धता, पुरवठा, टंचाई, साठेबाजी, महागाई निर्देशांक अशा विविध मुद्द्यांशी संबंधित ही माहिती आहे. परंतु आता साखर व्यापाऱ्यांची नावे केंद्राला कशासाठी हवी आहेत, याचा उलगडा आम्हाला झालेला नाही,’’ असे साखर उद्योगातील उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे.

Sugar Market
Sugar Market : ऑक्टोबरचा साखर कोटा दहा दिवस आधीच जाहीर

‘माहिती संकलनाशी राज्याचा संबंध नाही’

साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की राज्यातील साखरेच्या व्यापाऱ्यांची माहिती गोळा करण्याबाबत सुरू असलेल्या पत्रव्यवहाराशी राज्याचा संबंध नाही. ही माहिती थेट केंद्राकडून गोळा केली जात आहे.

त्यात साखर आयुक्तालयाचा सहभाग नाही. साखर कारखान्यांनी स्वतःचे प्लॅन्ट कोड नमूद करून आपापल्या कक्षेतील व्यापारी किंवा अधिकृत वितरकांची यादी sugarcontrol-fpd@gov.in या मेलवर पाठवायची आहे. साखर कारखान्यांनी हे काम ‘अत्यंत महत्त्वाचे’ समजून पार पाडावे, अशीदेखील सूचना केंद्राने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com