Krushi Mulya Ayog : केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची मंगळवारी मुंबईत बैठक

Agriculture Value Commission : सन २०२५-२६ या रब्बी हंगामातील पिकांचे हमीदर निश्‍चित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची मंगळवारी (ता.११) मुंबईत बैठक होऊ घातली आहे.
Krishi Mulya Ayog
Krishi Mulya AyogAgrowon

Akola News : सन २०२५-२६ या रब्बी हंगामातील पिकांचे हमीदर निश्‍चित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची मंगळवारी (ता.११) मुंबईत बैठक होऊ घातली आहे.

या बैठकीत देशातील पश्‍चिम भारतातील राज्यांचे प्रतिनिधी, काही निमंत्रित शेतकरी उपस्‍थित राहतील. आगामी रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांची खरेदी करण्याच्या उद्देशाने हमीदर निश्‍चित करण्यात येणार आहेत.

Krishi Mulya Ayog
Agriculture Value Addition : शेतीमालाच्या मूल्यवर्धनातूनच आर्थिक सक्षमता : डॉ. गडाख

गेल्या हंगामासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने गहू २१२५, हरभरा ५३३५, मसूर ६०००, मोहरी ५४५०, सूर्यफूल ५६५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केले होते.

Krishi Mulya Ayog
Agricultural Value Commission : कृषी मूल्य आयोग करतोय दिशाभूल

यंदा या दरांमध्ये किती वाढ केली जाईल, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. हमीदर निश्‍चितीच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक मानली जाते.

या बैठकीला भारतातील पश्‍चिम राज्यांमधील कृषी संशोधन परिषद पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधीही या वेळी निमंत्रित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, गोवा, दीव-दमण या प्रदेशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com