Agricultural Value Commission : कृषी मूल्य आयोग करतोय दिशाभूल

हमीभाव हा उत्पादन खर्चावर आधारित असून, ‘उत्पादन खर्चावर दीडपट भाव’ हे हमीभावाचे सूत्र आपण स्वीकारले आहे.
Agricultural Commission
Agricultural CommissionAgrowon

‘योग्य हमीभाव देऊ; पण उत्पादन खर्च कमी करा.’ केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने (Central Agricultural Commission) हे विधान केले असेल तर ते हमीभावासंदर्भात दिशाभूल करणारे असे आहे.

हमीभाव (Msp Price) हा उत्पादन खर्चावर आधारित असून, ‘उत्पादन खर्चावर दीडपट भाव’ हे हमीभावाचे सूत्र आपण स्वीकारले आहे.

मुद्दा क्रमांक १

उदाहरणार्थ ः एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च हा (A2 + FL सूत्रानुसार २०० ₹ प्रतिक्विंटल असा आला असेल तर

हमीभाव = उत्पादन खर्च × १.५ = २०० × १.५ = ३०० ₹

- उत्पादन खर्च कमी म्हणजे १०० ₹ प्रतिक्विंटल केल्यास (A2 + FL सूत्रानुसार हमीभाव = उत्पादन खर्च × १.५ = १०० × १.५ = १५० ₹

या उदाहरणांवरून लक्षात येईल की उत्पादन खर्च कमी केल्यास हमीभाव कमी होतो (ग्राहक हिताचा) व नफ्यात टक्केवारीनुसार फरक पडण्याचे कारणच नाही.

कारण नफा ५० टक्के (दीडपट) हे सूत्र कायम आहे, प्रत्यक्षात नफा १) नुसार १०० ₹ प्रतिक्विंटल व २) नुसार ५० ₹ प्रतिक्विंटल असा होत आहे.

मुद्दा क्रमांक २

कृषी निविष्ठांचे वाढलेले दर सरकार कमी करेल का?

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वाढलेली मजुरी, खत, बियाणे, औषधी, सिंचन व्यवस्था, वाहतूक, विद्युत देयके, कृषी यंत्र व कृषी अवजारे यांचे वाढलेले दर कमी होणे गरजेचे आहे. याबाबत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने कोणतेही विधान केलेले दिसत नाही.

Agricultural Commission
Tur Market: सरकारच्या हमीभाव खरेदीचा बाजाराला आधार मिळेल | Agrowon | ॲग्रोवन

शेतकऱ्यांना खर्च कमी करण्यास सांगतानाच हा खर्च कमी करण्याबाबत आयोगाने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

सदरील बाबींचा खर्च कमी केल्यासच उत्पादन खर्च कमी होणार आहे व जे आयोगास अपेक्षित आहे. शेतकरी म्हणून,‘आयोगाच्या दिशाभूल करणाऱ्या विधानाचा मी जाहीर निषेध करतो.’

हेमचंद्र शिंदे, रावराजूर, ता. पालम, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com