Flood Management : महापूर नियंत्रणासाठी केंद्राचे मुंबई, पुण्यावर लक्ष; अमित शाहांनी केली मोठी घोषणा

Amit Shah News : महाराष्ट्रात २०१९ आणि २०२१ साली अतिवृष्टी झाल्याने राज्यातील बहुतांश भागात महापुराचे संकट ओढावले होते. दरम्यान याचा जोरदार फटका मुंबई आणि पुणे शहराला बसला होता.
Flood Management
Flood ManagementAgrowon
Published on
Updated on

Flood Management : महाराष्ट्रात २०१९ आणि २०२१ साली अतिवृष्टी झाल्याने राज्यातील बहुतांश भागात महापुराचे संकट ओढावले होते. दरम्यान याचा जोरदार फटका मुंबई आणि पुणे शहराला बसला होता. राज्यातील या दोन प्रमुख शहरात महत्वाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने कित्येक तास शहरे बंद होती.

याचबरोबर पुणे जिल्ह्यातील शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारकडून काही प्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई, पुण्यासह ७ शहरांमध्ये येणाऱ्या पुराचा धोका कमी करण्यासाठी केंद्राकडून २ हजार ५०० कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केली.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली. या बैठकीत शाह यांनी ही घोषणा केली. या बैठकीस राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता उपस्थित होते. यामध्ये मुंबई, पुणे यांच्यासह चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची शाह यांनी दिली.

Flood Management
Marathwada Flood : मराठवाड्यात १०१३ गावे पूरप्रवण

शाह यांनी देशभरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ८ हजार कोटींहून अधिक किमतीच्या तीन महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या. त्यानुसार राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी ५ हजार कोटींचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची माहिती दिली.

शहरांमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी सात सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांसाठी २ हजार ५०० कोटींचे प्रकल्प उभारले जातील असेही शाह म्हणाले.

तसेच भूस्खलन शमन करण्यासाठी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८२५ कोटी रूपयांची राष्ट्रीय भूस्खलन जोखीम शमन असे महत्त्वाचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री शाह यांनी केली.

यासह ३५० अति जोखीम आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख युवा आपदा मित्र (स्वयंसेवक) तयार करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यामुळे आपत्ती उद्भवल्यास त्यातून जलदरित्या बाहेर निघता येईल.

राज्यात या पद्धतीचे प्रशिक्षित आपदा मित्र आठ हजाराच्यावर आहेत. महाराष्ट्र राज्य असे पहिले राज्य आहे ज्यांनी प्रशिक्षित आपदा मित्र अशी संकल्पना राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com