Dehu, Alandi : देहूत ‘गाथा पुनरुत्थान’ दिन

Sant Tukaram Maharaj : इंद्रायणीत गुरुवारी संत तुकाराम महाराज गाथेचे सामूहिक वाचन
Saint Tukaram Maharaj
Saint Tukaram MaharajAgrowon

Pune News : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांची गाथा तरल्याचा दिवस (चैत्र शुद्ध तृतीया) या वर्षापासून ‘गाथा पुनरुत्थान दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गुरुवारी (ता.११) सकाळी ८.३० वाजता देहूमधील इंद्रायणी नदीकाठी गाथेतील अभंगांचे सामूहिक वाचन होईल, अशी माहिती गाथा परिवाराकडून देण्यात आली आहे.

यानिमित्त मंगळवारी (ता.२) आयोजित पत्रकार परिषदेत गाथा परिवाराचे अध्यक्ष हभप उल्हास महाराज पाटील, हभप तुकाराम महाराज घाडगे आणि किशोर ढमाले यांनी दिली. कार्यक्रम गाथा परिवार आणि गाथा पुनरुत्थान दिन उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत.

Saint Tukaram Maharaj
Alandi Kartili Wari : अवघी अलंकापुरी दुमदुमली...

श्री. पाटील म्हणाले,‘‘समाजामध्ये मानवतेचा संदेश देणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्यावर विविध आरोप करून तत्कालीन धर्मपीठाने त्यांना गुन्हेगार ठरविले. त्यांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडविण्याची आणि पुन्हा अभंग लिहिण्यावर बंदीची शिक्षा ठोठावली. गाथा बुडवल्यावर तुकाराम महाराज यांनी अन्नपाण्याचा त्याग करून इंद्रायणीच्या तीरावरच ठाण मांडले.

त्यांचे असंख्य अनुयायी सहकारी इंद्रायणी काठी एक झाले. एकेक अभंग गात राहिले. तेरा दिवसांनी चैत्र शुद्ध तृतीयेला या दिवशी गाथा तरली, गाथेचे पुनरुत्थान झाले आणि ती असंख्य अडथळ्यांना दूर सारत चारशे वर्षे आपल्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहचत राहिली. संत तुकाराम महाराज यांची ‘गाथा तरली’ हे सर्वांच्या दृष्टीने परम आनंदाचे आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे.’’

पाटील म्हणाले,‘‘ गाथा हे मानव जातीचे अक्षय्य धन असल्याने हा दिवस मराठी भाषा आणि संस्कृतीवर तसेच जगद्गुरू तुकाराम महाराजांवर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी परम आनंदाचा दिवस आहे. म्हणून चैत्र शुद्ध तृतीया हा दिवस ‘गाथा पुनरुत्थान दिन’ अर्थात आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

गुरुवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजता  देहू इंद्रायणीच्या तीरी जिथे गाथा तरली त्याच ठिकाणी (गाथा मंदिराजवळील इंद्रायणीच्या डोहात) जमणार आहोत. इंद्रायणीच्या पाण्यात उभे राहून सामूहिक ‘गाथा पारायण’ करणार आहोत.महाराजांच्या शिकवणुकीचा आणि कार्याचा वसा स्वीकारणार आहोत. त्यानंतर डॉ. मोरे यांचे व्याख्यान होईल. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com