Cashew Processing: राज्यात काजू प्रक्रिया व्यवस्था बळकट करा : पणनमंत्री रावल

Jaykumar Rawal: राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील काजू प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
Marketing Minister Jayakumar Rawal
Marketing Minister Jayakumar RawalAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यात आणि देशात काजूची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काजूची उत्पादकता वाढविण्याची संधी असून, आवश्यक त्या उपाययोजना करून उत्पादकता वाढविता येईल. त्यासाठी काजू पिकाचे उत्पादन घेताना तसेच उत्पादनानंतर त्यावर होणाऱ्या प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या अडचणींवर अभ्यासपूर्ण उपाययोजना कराव्यात.

राज्यातील काजू उत्पादकता व प्रक्रिया व्यवस्था सक्षम करण्यासाठी जगातील प्रमुख देशांतील अद्ययावत प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते आपल्याकडे राबविण्या संदर्भात उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

Marketing Minister Jayakumar Rawal
Jaykumar rawal news : पणन मंत्री जयकुमार रावल यांना न्यायालयाचा दणका; २६ एकर जमीन हडप केल्याचं प्रकरण

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची येथे गुरुवारी (ता. ८) बैठक झाली. त्या वेळी मंत्री रावल बोलत होते. या वेळी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक श्रीधर डुबे पाटील, महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने तसेच काजू मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

मंत्री रावल म्हणाले, की काजू उत्पादनाच्या वाढीसाठी जगातील चांगल्या काजू वाणाचा अभ्यास करून राज्यात लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. काजू पीक आल्यानंतर त्यावर प्रक्रिया व साठवणूक करण्याच्या कामासाठी महिला बचत गटाचा तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग करून घ्यावा.

त्यांनाही रोजगार निर्मिती होऊन, काजू प्रक्रिया जलद गतीने होण्यास मदत होईल. काजूतील ओलावा कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांना गोदाम उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्यात. चंदगड आणि कुडाळमध्ये काजू प्रक्रिया उद्योग उभारण्यासंदर्भात व्यवहार्यता तपासण्यात यावी. तसेच ५०० टन क्षमतेचे गोदाम उभारण्याबाबत नियोजन करावे.

Marketing Minister Jayakumar Rawal
Minister Jaykumar Rawal : पथदर्शी कामातून चेहरामोहरा बदलवू

काजू उत्पादन, त्यावरील प्रक्रिया, ग्रेडिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि मूल्यवर्धनासाठी जगातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. काजू उद्योगांना अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करावा. काजू उद्योगांना अद्ययावत करण्यासाठी व्हिएतनाम, कंबोडिया यांसारख्या देशातील तसेच जगातील प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते महाराष्ट्रात कसे राबवले जातील यासाठी काजू मंडळाने नियोजन करावे.

१०० टन प्रति दिन उत्पादन क्षमतेचे प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील, या संदर्भात उपाययोजना कराव्यात. लागवडीपासून ते प्रक्रिया करून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापराचे नियोजनपूर्वक काम केले तर काजू उत्पादन व उत्पन्न वाढू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी काजू मंडळाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com