Nashik News : विधानसभेसाठी मतदानाला अकरा दिवस उरलेले असताना मतदारांना प्रलोभनासाठी विविध फंडे अवलंबले जात आहेत. रोकड तसेच मद्य, ड्रग्जच्या वापरासोबतच मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी विविध वितरणासाठी वाहतूक होणाऱ्या वस्तू जिल्हा प्रशासनाने हस्तगत केल्या आहेत. जिल्ह्यात शनिवार (ता.९) पर्यंत एक कोटी ७७ लाख तीन हजारांच्या रोकडसह एकूण आठ कोटी २९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शनिवारी (ता.९) माहिती दिली. मतदानाच्या दिवसापर्यंत विविध पथकांकडून हालचालींवर लक्ष ठेवत कारवाईचा धडाका सुरुच ठेवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तैनात पथकांकडून विविध गतिविधींवर बारकाईने लक्ष आहे. तरीदेखील छुप्या मार्गांनी वस्तू, रोकडची वाहतूक केली जात असल्याचे समोर येते आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जाते आहे. आत्तापर्यंत तब्बल ८ कोटी २९ लाख रुपयांचा मुद्देमाल विविध ठिकाणांहून हस्तगत केलेला आहे.
एक कोटी ३० लाखांचे सोने-चांदी हस्तगत
सोने-चांदीसारखे एकूण एक कोटी ३० लाख ८२ हजार रुपये किमतीचे मौल्यवान धातूदेखील हस्तगत केले आहे. यामध्ये एक कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल नाशिक मध्यमधून तर १५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल सिन्नर मतदारसंघातून हस्तगत केला आहे. पंचवीस लाखांचे अमली पदार्थ हस्तगत केला आहे.
विविध ठिकाणी कारवाई करत २४ लाख ५६ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केलेला आहे. यामध्ये इगतपुरीतून गांज्यासह २० लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चांदवडमधून ४२ हजार, देवळाली १३ हजार, मालेगाव मध्य एक लाख ६५ हजार, मालेगाव बाह्य दोन हजार, निफाडमधून दोन लाख एक हजार रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
जप्त ऐवजाचा तपशील
जप्त केलेली रोकड ः १ कोटी ७७ लाख ०३ हजार रुपये
जप्त केलेला मद्यसाठा ः २ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपयांचा
जप्त केलेले ड्रग्ज ः २४ लाख ५६ हजार रुपयांचे
जप्त केलेल्या मौल्यवान वस्तू ः १ कोटी ३० लाख ८२ हजार रुपये किमतीची
जप्त केलेल्या वस्तू ः २ कोटी ६१ हजार ३९ हजार
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.