Cleanliness Campaign : धरण, नाल्यातील गाळ काढण्याची मोहीम राबवा

Dr. Kiran Patil : धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासाठी मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
IAS Kiran Patil
IAS Kiran PatilAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : धरणातील गाळ काढणे आणि नाला खोलीकरणासाठी राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांत पुरांमुळे गाळ साचलेला असल्याने नाला खोलीकरणास वाव आहे. त्यामुळे धरण आणि नाल्यातील गाळ काढण्यासाठी मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

धरण व नाल्यातील गाळ काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

IAS Kiran Patil
Radhakrishna Vikhe Patil : स्वच्छता मोहीम ही लोकचळवळ व्हावी : विखे

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, ‘‘गाळमुक्त धरण आणि नाला खोलीकरणासाठी जलयुक्त शिवार योजनेतून कार्य करण्यात येत आहे. तसेच सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे जलसंधारण विभागाने धरणामध्ये किती गाळ साचला आहे, याची माहिती घ्यावी. हा गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी तातडीने पावले उचलावीत.

IAS Kiran Patil
Gram Swacchata Abhiyan : ग्राम स्वच्छता अभियानाच्या तपासणीची गैरहजरी भोवली

निवडण्यात आलेल्या संस्थांना तालुकानिहाय कामे वाटप करण्यात यावीत. धरणातील गाळ काढण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे संस्थांनी जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी प्रयत्नशील व्हावे.’’ जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांतील पुरामुळे नाल्यांमध्ये गाळ साचला आहे.

तसेच पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. नाला खोलीकरण हे वर्षभर चालणार आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या निधीची मागणी आतापासूनच करावी. गाळ काढण्यासाठी राज्य शासनाचा ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ सोबत करार झाला आहे. गाळ काढण्यासाठी डिझेलचा खर्च स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार आहे. दिलेली कामे पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com