MPSC Exam : निकालावेळी उमेदवार अपात्र

MPSC Exam Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनेक सूरसकथा चर्चेत आहेत. ‘एमपीएससी’चा आणखी नवीन फंडा समोर आला आहे.
Mpsc Exam
Mpsc ExamAgrowon

विकास गाढवे

Latur News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध पदांच्या भरती प्रक्रियेत अनेक सूरसकथा चर्चेत आहेत. ‘एमपीएससी’चा आणखी नवीन फंडा समोर आला आहे. एका पदाच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा व मुलाखतीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर उमेदवारांना पदासाठी अपात्र घोषित केले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी पदाच्या भरतीत हा प्रकार घडला असून उमेदवारांचे अडीच वर्षाचे परिश्रम वाया गेले आहेत.

वैद्यकीय शिक्षण व अन्नद्रव्य विभागांतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातील प्रशासकीय अधिकारी (सामान्य राज्यसेवा) गट ‘ब’ या चार पदासाठी ‘एमपीएसी’कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर राज्यातील अमरावती, नागपूर, नांदेड, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथील केंद्रावर संगणकीय प्रणालीतून लेखी परीक्षा घेण्यात आली.

Mpsc Exam
MPSC Agriculture Department : कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा सरकारने दोन दिवसांत निर्णय फिरवला

या परीक्षेच्या निकालातून २१ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविले. यातील १८ उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलविले. प्रत्यक्ष १७ उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. सव्वादोन वर्षाच्या प्रवासानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने कोणत्या तरी विषयात ‘एमपीएससी’ला अभिप्राय कळवला.

या अभिप्रायानुसार ‘एमपीएससी’ने आठ उमेदवारांना अपात्र ठरविले आहे. हा अभिप्राय पदाच्या कोणत्या पात्रतेविषयी होता, हे कळू शकलेले नाही. ऐनवेळी अपात्र ठरवण्यामागील गौडबंगाल कायम आहे. मात्र यामुळे उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.

Mpsc Exam
MPSC Exam : 'एमपीएससी'चा घोळ काही थांबेना; पीएसआयनंतर आता आणखी दोन परिक्षांचा तारखा पुढे ढकलल्या

पात्रतेबाबतचा निकष अर्ज स्वीकृतीच्या वेळी लागू केला असता तर परीश्रम व वेळ वाया गेला नसता. पात्र नसताना लेखी परीक्षा व मुलाखती का घेतल्या, असा प्रश्‍न उमेदवारांनी उपस्थित केला. याबाबत ‘एमपीएससी’च्या सरळ सेवा - निकाल विभागाच्या उपसचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनीवर काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

भरती प्रक्रियेचा घटनाक्रम

- जाहिरात - २१ सप्टेंबर २०२२

- लेखी परीक्षा - २ डिसेंबर २०२२

- लेखी परीक्षेचा निकाल - ४ जुलै २०२३

- मुलाखती - २४ जानेवारी २०२४

- विभागाचा अभिप्राय - ३ एप्रिल २०२४

- अंतिम निकाल - १२ जून २०२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com