Almatti Dam : आलमट्टी धरणाच्या उंचीचा प्रस्ताव रद्द करा ; धनाजी चुडमुंगे ः नृसिंहवाडीत हरकत अभियानास प्रारंभ

Almatti Dam Water Level : ‘आलमट्टी धरणाच्या पाणी पातळीच्या हरकतीबाबत महाराष्ट्र शासनाला विसर पडला आहे. महाराष्ट्रातील पूरस्थिती ही निसर्गाची चूक नाही, ती नियोजनाच्या चुकीचा परिणाम आहे.
Almatti Dam
Almatti DamAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : नृसिंहवाडी, जि कोल्हापूर ः नृसिंहवाडी, जि कोल्हापूर ः ‘आलमट्टी धरणाच्या पाणी पातळीच्या हरकतीबाबत महाराष्ट्र शासनाला विसर पडला आहे. महाराष्ट्रातील पूरस्थिती ही निसर्गाची चूक नाही, ती नियोजनाच्या चुकीचा परिणाम आहे. आता कर्नाटक सरकार आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा विचार करत आहे.

आपण शांत राहणे म्हणजे आपल्या भवितव्याला धोका पत्करणे होईल. हे आंदोलन राजकीय नाही. ही लोकांची चळवळ आहे. आलमट्टी धरणाच्या उंची वाढीचा प्रस्ताव त्वरित रद्द करा, ही आपली प्रमुख मागणी असून, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हरकती दाखल कराव्यात,’ असे आवाहन ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी केले.

Almatti Dam
Almatti Dam Kolhapur Sangli : 'आलमट्टी'च्या उंचीचा घाट; कोल्हापूर, सांगलीची शेती होणार भूईसपाट? तीव्र विरोध होणार का?

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे आलमट्टी धरणाच्या उंचीच्या विरोधात हरकती दाखल करण्यासाठी घेण्यात आलेल्या हरकत अभियानास प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी उपसरपंच अनंत धनवडे, संजय शिरटीकर, मुरलीधर गवळी, गुरुप्रसाद रिसबुड आदी प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत या अभियान मेळाव्यात हरकती दाखल केल्या.

अनंत धनवडे म्हणाले, की नृसिंहवाडी हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून, पंचगंगा नदीच्या संगमामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होते. येथे सर्वांत आधी पूर येतो आणि सर्वांत उशिरा ओसरतो. त्यामुळे येथील व्यापारी पेठ, शेती आणि नागरिकांचे मोठे नुकसान होते. ही समस्या समजून घेत कर्नाटक सरकारने आलमट्टी उंची वाढीचा प्रस्ताव रद्द करावा.

मुरलीधर गवळी म्हणाले, की उन्हाळ्यात महाराष्ट्रातून कर्नाटकला पाणी दिले जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन दोन्ही राज्यांनी एकमेकांच्या हिताचा विचार करायला हवा, मात्र कर्नाटक सरकार जर महाराष्ट्राला विचारात न घेता निर्णय घेत असेल, तर याचा तीव्र विरोध होणे गरजेचे आहे.
या वेळी गुरुप्रसाद रिसबूड, संजय शिरटीकर, विकास पुजारी, प्रमोद मुळे, सुकुमार वागळे, अशोक खोचरे, दीपक पाटील आदी मान्यवरांनी आपली मते मांडली.

या प्रसंगी सत्यजित सोमण, दीपक कबाडे, दादा गवळी, राजू ढवळे, विजय जोशी, प्रकाश बजे, रघुनाथ पाटील, उदय होगले, नागेश काळे, अप्पासाहेब कदम, संजय चौगुले, पप्पू मुगळे, भास्कर गावडे, प्रकाश सूर्यवंशी, कृष्णा देशमुख यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
२००५ पासून महाप्रलयंकारी तीन महापूर कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्याने पाहिले आहेत. जर आज आपण आवाज उठवला नाही, तर उद्या आपले अस्तित्वच पाण्यात जाईल.
-धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com