
Pune News : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज (ता.१५) पार पडला. संध्याकाळी ४ वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी झाला. यावेळी नव्या मंत्र्यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित होते.
राज्यात महायुतीचे सरकार येऊन ११ दिवसांनंतरही सरकारचा विस्तार झाला नव्हता. तर देवेंद्र फडणवीस ३.० सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरत नव्हता. मात्र आज सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तार झाला. यावेळी ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपकडून १९, शिवसेना ११ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ९ आमदारांचा समावेश होता. तर ३३ जनांची कॅबिनेटपदी तर ६ जणांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे.
उद्यापासून (ता.१६) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यापूर्वी २१ डिसेंबर १९९१ रोजी काँग्रेसचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा नागपुरात विस्तार झाला होता. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीतील मंत्र्यांचा येथे शपथविधी होत आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी नागपुरात राष्ट्रवादीची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी मंत्रीपदाबाबत वक्तव्य केले. त्यांनी आज शपथ घेणाऱ्यांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल, असे सांगितले.
चंद्रशेखर बावणकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत बच्चू पाटील, गिरीष महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, जयकुमार रावल, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर
हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद जाधव-पाटील, बाबासाहेब पाटील
गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर
माधूरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर
इंद्रनील नाईक
अशिष जैस्वाल, योगेश कदम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.