Organic Farming : सेंद्रिय उत्पादनासाठी सहकारी संस्थेच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सेंद्रिय शेतीशी संबंधित उपक्रमांचे व्यवस्थापन करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार असल्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.११) सहकारी संस्थांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय शेतमाल (Organic products) पुरवठा साखळी निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. तसेच राष्ट्रीय पातळीवर सहकारी संस्था (cooperative society) स्थापन करण्यासही मान्यता दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तसेच सेंद्रिय शेतीशी संबंधित उपक्रमांचे व्यवस्थापन करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार असल्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

Organic Farming
Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड तेजीत

बहु-राज्य सहकारी संस्था कायदा २००२ अंतर्गत सेंद्रिय उत्पादनांसाठी सहकारी संस्था स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या सहकार्य घेतले जाणार आहे, असे सहकार मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील सर्व संस्था या संस्थेच्या सदस्य होऊ शकतात. तसेच सोसायटीचे मंडळाच्या उपनियमांनुसार या संस्थेत स्थानिक संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधीचा समावेश करण्यात येणार आहे. सहकारी संस्था प्रमाणित आणि अस्सल सेंद्रिय उत्पादने प्रदान करून सेंद्रिय क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचे व्यवस्थापन या संस्थेद्वारे करण्यात येईल, असेही पत्रकात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपक्रमांची बांधणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये सेंद्रिय शेतमालाच्या पॅकेजिंग, ब्रँडिंग, प्रामाणीकरण , चाचणी, खरेदी, स्टोरेज, प्रक्रिया, लेबलिंग, लॉजिस्टिक सुविधा, इत्यादि सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावाही केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com