Vidarbha Crop Insurance: विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई; जिल्हानिहाय अपडेट

Kharif 2024 Payout: खरिप हंगाम २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ८४९ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून, त्यातील ६५२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Pune News: विदर्भातील १० जिल्ह्यांमध्ये खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत ८४९ कोटी रुपयांची भरपाई मंजूर होती. त्यापैकी ६५२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर १९७ कोटी रुपये जमा कऱण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले. 


विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून विमा भरपाई मंजूर आहे. तर गोंदीया जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगमधून भरपाई मंजूर झालेली नाही. तसेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून म्हणजेच अग्रिम भरपाई अद्याप एकाही जिल्ह्यात मंजूर नाही. यवतमाळ जिल्ह्यात अग्रीमची अधिसूचना काढण्यात आली होती. पण विमा कंपनीने ती फेटाळली. त्यामुळे हा विषय अपिलात गेला आहे. 

Crop Damage Compensation
Crop Insurance: पीक विम्याचा ‘फडणवीस पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, आणि गडचिरोली या १० जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना स्थिनिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून ८४९ कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत ६५२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर उरलेले १९७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरु आहे, असे कृषी विभागाने सांगितले. 

बुलडाणा
विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत ३१६ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे. त्यापैकी १४४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर १७२ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. 

अमरावती
अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत ५१ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. 

Crop Damage Compensation
New Crop Insurance: सुधारित पीकविमा योजनेला मान्यता; केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार 

अकोला
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत ७७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ७५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर २ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. 

वाशीम
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३३ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत ११ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर २२ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. 

यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत १५३ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे. ही सर्व रक्कम जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

वर्धा
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत ११६ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे. तर ३० एप्रिलपर्यंत जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. 

नागपूर
नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६२ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर आहे. ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम जमा करण्यात आली. 

भंडारा
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ४ लाख रुपये भरपाई आतापर्यंत मंजूर झाली. ही सर्व रक्कम थकीत आहे. 

चंद्रपूर 
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३९ कोटी रुपये मंजूर आहेत. ३० एप्रिलपर्यंत ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना वाटण्यात आली. 

गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली. ही सर्व रक्कम ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com