Brinjal Crop : वांगी लागवड करताना या गोष्टी कराच!

Team Agrowon

सुपीक, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी कसदार जमिनीमध्ये वांगी पिकाचे चांगले उत्पादन मिळते.

Brinjal Crop | Agrowon

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते वापरल्यास उत्पादन वाढीस फायदा होतो.

Brinjal Crop | Agrowon

जमिनीचा सामू ५.५ ते ६.६ असल्यास पिकाची वाढ उत्तम होते.  खरीप हंगामासाठी रोपवाटिकेत बियांची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची पुनर्लागवड जुलै-ऑगस्टमध्ये करावी.

Brinjal Crop | Agrowon

कमी वाढणाऱ्या, सरळ जातीसाठी हेक्टरी ४०० ते ५०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते.

Brinjal Crop | Agrowon

संकरित, जास्त वाढणाऱ्या जातीसाठी हेक्टरी १२० ते १५० ग्रॅम बियाणे पुरेसे होते.

Brinjal Crop | Agrowon

प्रति किलो बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

Brinjal Crop | Agrowon
क्लिक करा