Ahmedpur Market: अहमदपुरात वांग्याने खाल्ला भाव

Vegetable Prices: शहर आठवडे बाजारात भाजीपाला भाव मागील एक महिन्यापासून स्थिर आहेत. सोमवारच्या (ता.३०) बाजारात वांग्याचा सर्वाधिक असा १२० रुपये किलोप्रमाणे भाव होता, तर बटाटे मात्र वीस रुपये किलोप्रमाणे विक्री झाले.
Ahmedpur Market
Ahmedpur MarketAgrowon
Published on
Updated on

Latur News: शहर आठवडे बाजारात भाजीपाला भाव मागील एक महिन्यापासून स्थिर आहेत. सोमवारच्या (ता.३०) बाजारात वांग्याचा सर्वाधिक असा १२० रुपये किलोप्रमाणे भाव होता, तर बटाटे मात्र वीस रुपये किलोप्रमाणे विक्री झाले. विशेष म्हणजे कांद्याचा भाव दहा ते पंधरा रुपयांपर्यंत होता.

अहमदपूर शहर आठवडी बाजार दर सोमवारी जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर शुक्रवारी थोडगा रोड येथे भरतो. तालुक्यातील तांबट सांगवी, लांजी, विळेगाव, कोपरा, सोनखेड, मानखेड, मोघा, धानोरा, तीर्थ, मोहगाव, दगडवाडी, हंगेवाडी, किनगाव, कोळवाडी या गावासह लातूर जिल्ह्यातील रेणापूर, उदगीर, नांदेड जिल्ह्यातील कंधार तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथून अहमदपूर बाजारपेठेत उत्पादक शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात.

Ahmedpur Market
Tur Market Price: तुरीच्या भावात पुढील काळात तेजी येईल का?

दरम्यान, सोमवारी बाजारात भेंडी, दोडके, कारले, कोबी, चवळी, सिमला मिरची, मटकी प्रत्येकी ८० रुपये किलो, हिरवी मिरची, टोमॅटो प्रत्येकी चाळीस रुपये, कांदे दहा ते पंधरा रुपये किलो, मेथी २५ रुपये पेंडी दहा रुपये पेंडी, पातीचे कांदे पंधरा रुपये पेंडी, भोपळा दहा रुपये नग असे भाव होते.

Ahmedpur Market
Agriculture Commodity Market : राज्य सरकारकडून हेजिंग डेस्क स्थापनेची घोषणा

लाल मिरची स्वस्त

मागील महिन्यात २४० रुपये प्रति किलो असलेल्या लाल मिरचीने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. आता मात्र लाल मिरचीचे भाव घसरले आहेत. सोमवारच्या आठवडे बाजारात १३० रुपये किलो प्रमाणे लाल मिरची विकली गेली.

ग्राहकांची संख्याही मंदावलेली

सध्या पेरणीचे दिवस असल्याने व पाऊस पडत असल्याने आठवडी बाजारात खरेदीदारांची संख्या मंदावली होती. सोमवारी आठवडे बाजारात दुपारी पाऊस आल्याने भाजीपाला विक्री करणारे शेतकरी व भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली.

आठवडी बाजारात भाजीपाल्याचे भाव एक महिन्यापासून स्थिर असला तरी परवडण्यासारखे नाही. या दराने आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी केला तर कमीत कमी दोनशे रुपये खर्च होत आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. त्यामुळे आता भाजीपाला स्वस्त झाला पाहिजे.
-ज्ञानेश्वरी भदाडे, गृहिणी
मागील महिन्यापासून सततचा पाऊस पडल्याने भाजीपाला दर महिन्यापासून सारखेच आहेत. वांगी पिकावर कीड पडल्याने आवक कमी झाली होती, त्याचा परिणाम वांग्याच्या किमती अधिक होत्या. पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाजीवर परिणाम होत आहेत.
- अझहर बागवान, भाजीपाला ठोक विक्रेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com