Ration Shops : रेशन दुकानातून साडी वाटपाला ‘ब्रेक’

Distribution of Sarees and Bags Stopped : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने साड्या व पिशव्यांचे वितरण जिल्हापुरवठा विभागाकडून थांबविले आहे.
Ration Shop Saree Distribution
Ration Shop Saree DistributionAgrowon

Nagpur News : रेशन दुकानातून अंत्योदय लाभार्थ्यांना साडीचे वितरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. काही दुकानांमधून याचे वितरणही करण्यात आले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने साड्या व पिशव्यांचे वितरण जिल्हापुरवठा विभागाकडून थांबविले आहे.

आदेश तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना दिले असून, आचारसंहिता संपल्यानंतरच साड्यांचे वितरण होणार आहे. साड्या व रेशन घेण्यासाठी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात वेळ गेल्याने १५ दिवसांपूर्वी तालुकास्तरावर या साड्या उपलब्ध झाल्या होत्या.

Ration Shop Saree Distribution
Ration Shop : नव्याने ९० गावांत होणार रास्त भाव धान्य दुकाने

मात्र आता लोकसभा आचारसंहितामुळे निवडणुकीच्या लाभार्थ्यांना साड्या वाटप न करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना दिले आहेत. तसेच प्रशासनातर्फे साडीची एन्ट्री पॉस मशिनमध्ये करण्यात आली होती. मात्र, आता आचारसंहितेमुळे एन्ट्री काढून टाकण्यात आली आहे.

त्यामुळे दुकानदार साडीचे वितरण करून शकणार नाहीत. तसेच पिशव्याही वितरित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रामटेक तालूक्यात अंत्योदयचे १२ हजार १३४ लाभार्थी आहे. तर प्राध्यान्यचे १९ हजार ६७३ लाभार्थी आहे. या लाभार्थ्यांना तालुक्यातील ११२ रेशन दुकानातून विविध योजनाचा लाभ मिळत असतो.

Ration Shop Saree Distribution
Ration Shops : रेशन दुकानात आता ‘आय स्कॅनर’

आनंदाचा शिधासाठी घरून आणावी लागेल पिशवी आचारसंहितेच्या काळात येणाऱ्या सणोत्सवामध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी आनंदाचा शिधा नेण्यासाठी राज्य शासनाकडून पिशवी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र त्या पिशव्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदीचे फोटो आहेत.

आचारसंहिता असल्याने अशा पिशव्यातून रेशन दिले जाणार नाही आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा आणण्यासाठी घरून पिशवी आणावी लागणार आहे.  आचारसंहितेचे होणार उल्लंघन रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या वस्तूवार सत्ताधारी लोकांचे छायाचित्र असेल तर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे शासनाची जाहिरात होऊन आचारसंहितेचे उल्लंघन होईल. मात्र ग्रामीण भागात याची पुरेशी माहिती नसल्याने वादंग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com