Cotton Processing Industry
Cotton Processing IndustryAgrowon

Cotton Processing Industry : ब्राझील देणार कापसावरील प्रक्रियेला प्रोत्साहन

Encouragement of Cotton Industry : सुधारित तंत्रज्ञानाच्या बळावर मिळणारी अधिक उत्पादकता आणि चांगला दर या कारणामुळे ब्राझीलमध्ये कापूस लागवड क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळेच येत्या काळात ब्राझीलमध्ये कापसावरील प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देणार आहे.
Published on

Nagpur News : सुधारित तंत्रज्ञानाच्या बळावर मिळणारी अधिक उत्पादकता आणि चांगला दर या कारणामुळे ब्राझीलमध्ये कापूस लागवड क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळेच येत्या काळात ब्राझीलमध्ये कापसावरील प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ब्राझीलमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने विदर्भातील जिनिंग उद्योगाची पाहणी केली.

ब्राझीलमध्ये उसाखालील सर्वाधिक क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. २०१६-१७ या वर्षापासून त्या भागातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीवर भर दिला. माटो ग्रोसे आणि बहिया ही दोन राज्ये कापूस लागवड आणि उत्पादकतेत आघाडीवर आहेत. या दोन राज्यांतच एकूण लागवडीच्या ८० टक्‍के क्षेत्र कापसाखाली आहे.

Cotton Processing Industry
Cotton Rate : मागच्या दहा वर्षांत कापूस सोयाबीनचे भाव वाढले नाही पडले

२०२२-२३ या हंगामात ब्राझीलमध्ये सुमारे १.६६ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होती. त्यानंतर २०२३-२३ या वर्षात हे क्षेत्र १.९९ लाख हेक्‍टरवर पोहोचल्याचे दावा करण्यात आला आहे. सुधारित तंत्रज्ञान, उच्च प्रतीचे बियाणे अशा कारणामुळे उत्पादकतेतही वाढ नोंदविली गेली आहे. हेक्‍टरी २२ ते २५ क्‍विंटल अशी उत्पादकता मिळत असल्याचे ब्राझीलमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले.

सध्या ब्राझीलची एकूण उत्पादकता २०० लाख गाठींपेक्षा अधिक आहे. एका शेतकऱ्याकडे सुमारे पाच हजार हेक्‍टरचे प्लॉट आहेत. मजुरांचा अभाव असल्याने कीटकनाशकाची फवारणी तसेच इतर व्यवस्थापनकामी चार्टड प्लेनचा उपयोग होतो. ही सारी यंत्रणा देखील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. कापसाखालील लागवड क्षेत्र विस्तारत असताना कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचा मात्र अभाव आहे. ही बाब लक्षात घेता विदर्भातील कापूस प्रक्रिया उद्योगाविषयी जाणून घेण्यासाठी तेथील जिनिंग व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या भागाचा दौरा केला.

Cotton Processing Industry
Cotton Market : नांदेड बाजार समितीकडून कापूस खरेदी सुरू

कळमेश्‍वर (नागपूर) येथील सुलतानिया ऑइल इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेडची पाहणी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने केली. या वेळी कंपनीचे संचालक तसेच विदर्भ कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष भावेश शहा यांनी त्यांना प्रक्रियेविषयी माहिती दिली. जिनिंग तसेच वस्त्रोद्योगाशी निगडीत संयंत्र विकसित करणाऱ्या बजाज उद्योगालाही भेट देण्यात आली.

ब्राझीलमध्ये एकूण लागवड क्षेत्राच्या अवघ्या सहा टक्‍के क्षेत्रावर कापूस लागवड आहे. तरीसुद्धा त्यांची उत्पादकता २०० लाख गाठीपेक्षा अधिक आहे. भारतात १३० लाख हेक्‍टरवर कापूस होत असताना उत्पादकता ३०० लाख गाठी इतकी मर्यादित आहे. परिणामी सुधारित तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे बियाणे अशा बाबींवर भर देण्याची गरज आहे. कापूस लागवड, उत्पादकता वाढत असल्याने त्यावर प्रक्रियेला प्रोत्साहन मिळावे याकरिता ब्राझीलच्या शेतकरी, व्यावसायिक शिष्टमंडळाने विदर्भातील उद्योगाची पाहणी केली.
भावेश शहा, संचालक, सुलतानिया ऑइल इंडस्ट्रीज तसेच अध्यक्ष, विदर्भ कॉटन असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com