Agriculture Scheme Issue : कृषी योजनांतील अडचणींवर नागपुरात मंथन

Agriculture Department : कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतील मोठे अडसर कोणते? ते दूर करण्यासाठी काय केले पाहिजे? अशा देखील सूचना फिल्डवर काम करणाऱ्यांनी सुचवाव्यात, असे आवाहन कृषी आयुक्‍त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
Dr. Praveen Gedam
Dr. Praveen GedamAgrowon

Nagpur News : कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतील मोठे अडसर कोणते? ते दूर करण्यासाठी काय केले पाहिजे? किंवा अशा काही योजनाच बंद कराव्या लागतील का? अशा देखील सूचना फिल्डवर काम करणाऱ्यांनी सुचवाव्यात, असे आवाहन कृषी आयुक्‍त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

Dr. Praveen Gedam
Cotton Market : परभणी, हिंगोलीत १४ लाख क्विंटलवर कापूस खरेदी

वनामती येथे राज्यातील कृषी विभागातील संचालक, सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच आत्मा प्रकल्प संचालक यांच्याकरिता मंगळवारी (ता. २१) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

डॉ. गेडाम म्हणाले, राज्यात येत्या काळात काही नवीन संकल्पनांवर काम केले जाणार आहे. त्याविषयी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर काम करणाऱ्यांकडून काही तरी नवीन संकल्पना पुढे आल्या पाहिजे. त्या संकल्पनांवर मत-मतांतरे ऐकून घेत त्याची अंमलबजावणी केली जाईल.

Dr. Praveen Gedam
Loksabha Election 2024 : मतदानाबाबत सकाळी, सायंकाळी उत्साह

वनामतीच्या संचालिका डॉ. मिताली सेठी यांनी येत्या काळात कृषी विभाग आणि वनामती (विस्तार यंत्रणा) सोबत काम करणार असल्याची माहिती दिली. छत्रपती संभाजी नगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. टी. एस. मोटे यांनी त्यांच्या विभागात राबविण्यात आलेल्या शून्य मशागत तंत्रज्ञानाचे परिणाम याविषयी सांगितले.

या संकल्पनेमुळे जमिनीचा पोत वाढला आहे. जमिनीच्या सेंद्रिय कर्बातही वाढ झाल्याने विभागात २२०० एकरावर शून्य मशागत तंत्रज्ञानानुसार पीक लागवड होते. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये याचा अवलंब व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com