Pearl millet: बाजरीच्या धनशक्ती वाणासाठी बोरलॉग पुरस्कार

गोविंदराज यांनी तयार केलेलं हे बाजरीचं वाण लोह आणि जस्त या खनिजांनी समृद्ध आहे. लोह आणि जस्त मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण घटक असतात. थोडक्यात कृषी क्षेत्रात काम करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम महालिंगम गोविंदराज यांनी केलंय.
Millet
MilletAgrowon

तेलंगणाचे कृषी शास्त्रज्ञ महालिंगम गोविंदराज (Mahalingam Govindraj) यांनी बाजरीचं धनशक्ती नावाचं एक वाण विकसित (Pearl Millet Dhanshkati Verity) केलं आहे. या वाणाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून त्यांना कृषी क्षेत्रातील मानाचा असा नॉर्मन ई. बोरलॉग पुरस्कार (Norman Borlaug Award) जाहीर झाला आहे.

गोविंदराज यांनी तयार केलेलं हे बाजरीचं वाण लोह आणि जस्त या खनिजांनी समृद्ध आहे. लोह आणि जस्त मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण घटक असतात. थोडक्यात कृषी क्षेत्रात काम करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम महालिंगम गोविंदराज यांनी केलंय.

गोविंदराज हे मूळचे तामिळनाडूचे. शेतीत काहीतरी नवं घडवायचं असं मनोमन पक्कं करून महालिंगम गोविंदराज यांनी अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्यांनी तामिळनाडूच्या किल्लीकुलम येथील अॅग्रिकल्चरल कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला.

पुढं त्यांनी तामिळनाडूच्या कृषी विद्यापीठातून प्लॅन्ट ब्रीडिंग व जेनेटिक्स या विषयात आपलं मास्टर्स पूर्ण केलं. आणि याच विषयात संशोधन सुरू ठेवत आपली डॉक्टरेटही पूर्ण केली.

Millet
BBF Technique : लेसर लेव्हलिंग, सरी वरंबा पद्धतींमुळे मिळाली बाजरी उत्पादनात चांगली वाढ

इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी-अरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) या संस्थेत त्यांनी जवळपास 10 वर्ष संशोधक म्हणून काम केलं. आपल्या प्रवासाबद्दल ते सांगतात, "मी ज्या भागात वाढलो त्या भागात तांदूळ हे मुख्य पीक होतं. माझं कुटुंबपण पारंपरिक पद्धतीने शेती करायचं. कॉलेजात जाऊन पदवी घेणारा मी माझ्या कुटुंबातला पहिलाच मुलगा होतो. शाळेत असताना मला विज्ञानाची गोडी लागली. पण घरी शेतीचं वातावरण होतं, साहजिकच शेतीकडेही माझा ओढा जास्त होता. शेवटी शेतीत वैज्ञानिक क्रांती करू असं म्हणत मी शिक्षण घेत राहिलो." आपलं शिक्षण पूर्ण केल्यावर हार्वेस्टप्लस इथं सीनियर सायंटिस्ट म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. ही संस्था बायोफोर्टिफाइड पिकांच्या उत्पादनावर काम करते.

बायोफोर्टिफिकेशन म्हणजे काय ?

तर पिकांची उत्पादकता आणि पोषक घटक वाढवण्यासाठी सिलेक्टीव्ह ब्रीडिंगची प्रक्रिया म्हणजे बायोफोर्टिफिकेशन. उपासमार किंवा पोषक घटकांच्या कमतरतेविरुद्ध लढण्यासाठी अनेक धान्यांमध्ये बायोफोर्टिफिकेशनचा वापर करतात. संस्थेत काम करत करत त्यांनी बाजरीवर बायोफोर्टिफिकेशनचा प्रयोग केला. बाजरी हे जगात ज्ञात असलेलं सर्वात जुनं धान्य आहे. भारतात पूर्वापार हे पीक घेतलं जातं.

गोविंदराज यांनी 2014 मध्ये बाजरीचं बायोफोर्टिफिकेशन करून धनशक्ती नावाचं नवीन वाण तयार केलं. त्यानंतर भारतातल्या जवळपास 1,20,000 शेतकऱ्यांनी या वाणांची लागवड केली. आणि त्यांच्या उत्पादनात वाढ झाली. पुढे त्यांच्या या नव्या वाणाची दखल रॉकफेलर फाउंडेशनने घेतली.

Millet
Millets :भरडधान्यांची अधिकाधिक लागवड करा - पंतप्रधान

अमेरिकेतील आयोवा राज्यात रॉकफेलर फाउंडेशन तर्फे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात 40 वर्षांपेक्षाही कमी वय असणाऱ्या संशोधकांना कृषिक्षेत्रातील रिसर्चबद्दल डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या नावे पुरस्कार दिला जातो. 2022 मध्ये हा पुरस्कार गोविंदराज यांनी पटकावला. गोविंदराज यांच्या या वाणाची महती सांगताना अमेरिकेतील वर्ल्ड फूड फाउंडेशन संस्था म्हणते की,

"200 ग्रॅम धनशक्ती बाजरीमधून तब्बल 80 टक्के लोह मिळते. या लोहाची गरज महिलांना मोठ्या प्रमाणावर असते. गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना जीवनसत्त्व, लोह आणि फॉलिक अॅसिड असा पूरक आहाराची कमतरता धनशक्ती बाजरीमधून पूर्ण होते. भारत आणि आफ्रिकेत धनशक्ती बाजरीला लोकप्रिय करण्यात गोविंदराज यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गरीब देशातील अन्नधान्याची समस्या सोडवण्यासाठी यामुळे मदत झाली असून त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. "

19 ऑक्टोबर 2022 रोजी डेसमोइन्स, आयोवा येथे नॉर्मन ई. बोरलॉग इंटरनॅशनल डायलॉगमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. विशेष म्हणजे आज गोविंदराज यांना नॉर्मन बोरलॉग यांच्या नावे जो पुरस्कार जाहीर झालाय त्या कृषी शास्त्रज्ञाचा भारतातील हरितक्रांतीमध्ये महत्वपूर्ण वाटा आहे. भारताने 1960 च्या दशकाच्या मध्यात हरित क्रांतीदरम्यान बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या बुटक्या वाणांची लागवड केली होती, ज्यामुळे देश अन्न उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. आणि याहूनही महत्वाचं काय असेल तर गोविंदराज यांच्या संशोधनावर नॉर्मन बोरलॉग यांचा प्रभाव आहे.

गोविंदराज आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात, "नॉर्मन बोरलॉग माझ्या संशोधनाचे प्रेरणास्थान आहेत. `अन्न मिळवणं हा जगात जन्मलेल्या सर्वांचा नैतिक अधिकार आहे` या नॉर्मन बोरलॉग यांच्या वाक्याने माझं आयुष्य बदलून गेलं."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com