Akola ZP Budget : ‘कृषी’साठी एक कोटी १७ लाखांची तरतूद

Agriculture Budget : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी जिल्हा परिषदेचे ४० कोटी ९३ लाख ७५ हजार रुपयांचे मूळ खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी एक कोटी १७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
Akola ZP
Akola ZPAgrowon
Published on
Updated on

Akola News : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी जिल्हा परिषदेचे ४० कोटी ९३ लाख ७५ हजार रुपयांचे मूळ खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी एक कोटी १७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यंदा चार कोटी ४२ लाख रुपये रक्कम शिल्लक राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कृषी उपयोगी साहित्य वितरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ यावर्षी १७ जानेवारीला संपला. त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू झाले आहे. प्रशासक काळात सर्व विभागांकडून मागणी मागवण्यात आली. त्यानंतर अर्थसंकल्पाला अंतिम आकार देण्यात आला आहे. बजेटमध्ये समाज कल्याण, पाणीपुरवठा, महिला व बाल कल्याण, सामान्य प्रशासन, शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, लघुसिंचन-लघू पाटबंधारे, आरोग्य व बांधकाम आदींसह विविध विभागांच्या योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Akola ZP
Beed ZP Budget : बीड जिल्हा परिषदेचा ९१ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प

मिनी डाळ मिलसाठी तरतूद

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागाने तीन कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांची तरतूद केली आहे. लघू उद्योगांसाठी मिनी डाळमिल पुरवण्याच्या उद्देशाने १ कोटी १५ लाखांची तरतूद आहे. मागासवर्गीय महिला लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी झेरॉक्स मशिनसाठी ५० लाख खर्च होणार आहेत. दिव्यांग व्यक्तिंच्या उत्पन्नवाढीसाठी, उद्योग उभारणीसाठी ४० लाखांची तरतूद ठेवण्यात आली आहे.

पीक संरक्षणासाठी तरतूद

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी १ कोटी १७ लाख ४ हजाराची तरतूद करण्यात आली आहे. शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी झटका मशिन पुरविण्याच्या उद्देशाने २६ लाख ५० हजार, मनुष्य चलित पेरणीयंत्र ५ लाख, बीज प्रक्रिया यंत्रासाठी ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Akola ZP
Buldana ZP Budget : बुलडाणा जि. प. अर्थसंकल्पात ट्रॅक्टर खरेदीसाठी ७५% अनुदानाची तरतूद

महिलांना प्रशिक्षण

ग्रामीण भागातील महिला, मुलींना सक्षम करण्यासाठी विविध प्रशिक्षणे तसेच त्यांच्या स्वयंरोजगारावरही भर देण्यात आला आहे. यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. किशोरवयीन मुलींना व महिलांना आरोग्य कुटुंब नियोजन कायदे विषयक विषयासाठी २८ लाख, उद्योगांसाठी सौंदर्य प्रसाधनांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी २८ लखांची तरतूद करण्यात आली आहे. अंगणवाड्यांचा दर्जा उंचवणे, डिजिटल करण्यासाठी १५ लाख खर्च होणार आहेत.

दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प

शिक्षण एक कोटी ६४ लाख ८१ हजार

कृषी एक कोटी १७ लाख ४ हजार

आरोग्य एक कोटी ५१ लाख ३३ हजार

पाणी पुरवठा व स्वच्छता आठ कोटी ५० लाख

सामाजिक सुरक्षा व कल्याण तीन कोटी ९३ लाख ८१ हजार

महिला व बाल कल्याण दोन कोटी

पशुसंवर्धन ९८ लाख ४२ हजार

वनीकरण सात लाख

पंचायतराज कार्यक्रम तीन लाख ५८ लाख ८० हजार

लघू पाटबंधारे ८४ लाख ५० हजार

परिवहन बांधकाम ९० लाख एक हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com