Sugarcane Fertilizer Management : उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर

Integrated Nutrient Management : उसाच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणे आवश्यक असते.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

ज्योती खराडे, डॉ. प्रीती देशमुख

उसाच्या अधिक उत्पादनासाठी जमिनीत सेंद्रिय, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होणे आवश्यक असते. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर करावा.

माती परीक्षण करून घेतल्यास जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्थिती आपल्याला कळते. त्याप्रमाणे रासायनिक खत मात्रा ठरवावी. ऊस वाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीत खत मात्रा देते वेळी नत्रयुक्त खते चार हप्त्यात विभागून द्यावीत. जमीन हलकी असेल तर नत्रयुक्त खते पाच-सहा वेळा विभागून द्यावीत.

जिवाणू खतांचा वापर

जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता शाश्‍वत ठेवण्यासाठी जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थ जमिनीतील जिवाणूंचे खाद्य आहे. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यास जिवाणू अधिक कार्यक्षम होतात. हे जिवाणू जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात, दिलेल्या रासायनिक खतांची उपलब्धता करुन देण्याचे काम करतात. त्यामुळे पिकाची वाढ होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

Sugarcane Farming
Sugarcane Fertilizers Management : आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन

व्हीएसआय निर्मित फवारणीद्वारे द्यावयाच्या खतांच्या वापराचे वेळापत्रक

Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgowon
Sugarcane Farming
Sugarcane Fertilizer Management : पूर्वहंगामी उसासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास लागणीच्या वेळी देण्यात येणाऱ्या खतांच्या मात्रा खालील तक्त्यात दिलेल्या आहेत.

Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon

ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर (कि /हे) : विद्राव्य खतांचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केल्यास खतांची उपयुक्तता वाढते आणि शिफारशीत खत मात्रेची ४० टक्के बचत होऊ शकते. खते मुळांच्या सान्निध्यात दिल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते. ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर करण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे अाहे.

Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon

- डॉ. प्रीती देशमुख ९९२१५४६८३१, (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com