Agri Based Business : शेतीपूरक उद्योग निर्मिती काळाची गरज

Agriculture Entrepreneurship : आजच्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत (एफपीसी) शेतीपूरक उद्योगांची निर्मिती ही काळाची गरज आहे.
Agri Based Industry
Agri Based Industry Agrowon
Published on
Updated on

Washim News : आजच्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत (एफपीसी) शेतीपूरक उद्योगांची निर्मिती ही काळाची गरज आहे. राज्य शासनाच्या सामूहिक प्रोत्साहन योजना, ‘मैत्री २.०’ सारखी डिजिटल पोर्टल्स आणि विविध सवलती यांचा लाभ घेत उद्योजकीय दृष्टिकोनातून उत्पादनवाढीचा विचार झाला पाहिजे.

जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही प्रत्येक टप्प्यावर सहकार्य करण्यास तत्पर आहोत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांनी केले. वाशीम जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उद्योजकांसाठी कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुवनेश्‍वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली. या वेळी त्या बोलत होत्या.

Agri Based Industry
Agri-Business Ideas : शेतकऱ्यांसाठी व्यवसायात पदार्पण करण्यासाठी नवे हटके पर्याय

या कार्यशाळेत सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि उद्योजकांना राज्य वस्तू व सेवा कर (एसजीएसटी), वीज दर अनुदान आणि व्याज अनुदान यासारख्या लाभांबाबत तपशीलवार माहिती देण्यात आली. तसेच, शासनाच्या उद्योग विभागाने सुरू केलेल्या मैत्री २.० या एक खिडकी योजनेच्या पोर्टलची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

Agri Based Industry
Agri Based Business : ‘मिशन भगीरथ प्रयास’मुळे शेतीपूरक व्यवसायांची वाढ

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी म्हणाल्या, की शेती ही केवळ उत्पादनापुरती मर्यादित न ठेवता, तिचे मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगाकडे वळविणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी भूमिका बजावावी. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व पातळीवर सहकार्य करण्यात येईल.

या कार्यशाळेत सीए पंकज अग्रवाल यांनी सामूहिक प्रोत्साहन योजनेची माहिती सविस्तरपणे समजावून सांगितली आणि उपस्थितांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पूनम घुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार, ‘नाबार्ड’चे शंकर कोकटवार, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह इतर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com