Palghar District Varah Palan : पालघर जिल्ह्यात वराहपालनातून शेतीपूरक व्यवसायाला गती

Palghar Agriculture News : वसई, पालघर, वाडा, तलासरी, डहाणू तालुक्यात गटाच्या माध्यमातून आणि स्वतंत्ररित्या वराहपालनाच्या व्यवसायाकडे शेतकरी वर्गाची वाटचाल सुरू आहे.
Palghar District Varah Palan
Palghar District Varah Palanagrowon
Published on
Updated on

Palghar Farmers : पालघर जिल्ह्यामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, ससेपालन असे अनेक व्यवसाय केले जातात, परंतु या सर्व व्यवसायांच्या सोबतीला सध्या वराहपालन हा एक व्यवसाय नावारूपाला येत आहे.

वसई, पालघर, वाडा, तलासरी, डहाणू तालुक्यात गटाच्या माध्यमातून आणि स्वतंत्ररित्या वराहपालनाच्या व्यवसायाकडे शेतकरी वर्गाची वाटचाल सुरू आहे. शेतीला जोडधंदा म्हणून जर वराहपालन व्यवसायाची सुरुवात केली, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत भर पडेल, असे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी सांगितले.वसई तालुक्यात गटाच्या माध्यमातून आणि स्वतंत्ररित्या वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

डहाणूतील कैनाड येथील भावेश वळवी, तलासरी तालुक्यात रवी सोनवाल, जिवल्या उंबरसाडा, वाडा तालुक्यात नारायण तांबडे, बोईसरमधील महिंद्र पिंपळे, सफाळे नवघरमधील रोहन पाटील, गंजाडचे सुनील वळवी, खारेकुरण येथील यतीन देसले, पालघर येथील अल्फान्सो यांनी लँडरेड डूरॉक्स या जातींच्या डुकरांचे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पालन केले आहे.

१५० किलोपर्यंत वजन

वराहाचा गर्भधारणा कालावधी ११४ दिवसांचा असतो. मादी वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देते. एकाच वेळी आठ ते १२ पिल्ले जन्मतात. ही पिल्ले दहा ते बारा महिन्यांनी विक्रीला होतात, त्या वेळी त्यांचे वजन १५० किलोपर्यंत पोहोचते.

विक्रीतून आर्थिक फायदा

वर्षभर संगोपन केल्यास वराहाचे साधारण १२० ते १३० किलो वजन भरते. किलोला साधारणत: १२० रुपये भाव मिळतो. वराहाच्या विक्रीपासून २५ ते २६ हजार रुपये उत्पन्न मिळते.

Palghar District Varah Palan
Palghar Crop Loss : डहाणू तालुक्यात ४७० हेक्टरला फटका

कोणते खाद्य लागते?

वराहपालन हा व्यवसाय मांस विक्रीच्या दृष्टीने करावयाचा असल्याने वराहच्या शरीरात भरपूर प्रमाणात फॅटचे प्रमाण वाढविणे आवश्यक असते. तेलकट पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. हॉटेलमधील उष्टान्न खाद्य, मेस, ढाबे, वसतिगृह, लग्नप्रसंग मधील उरलेले अन्न, निरुपयोगी खाद्यपदार्थ, भाजीपाला आदींचा खाद्यामध्ये फॅट निर्मितीसाठी समावेश करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com