Team Agrowon
अशी परवानगी मिळालेले मोहरी हे पहिले मानवी खाद्यातील पीक आहे. मात्र, जीएम पिकांना विरोध करणाऱ्या तज्ज्ञांनी न्यायालयात जाऊन फुलोऱ्यापूर्वीच ही पिके नष्ट करण्याची मागणी केली आहे.
जीएम मोहरी पर्यावरणासाठी हानीकारक आहे. दुसऱ्या बाजूला जीएम पिके ही शेतीचे भविष्य आहेत, असे मानणाऱ्या शास्त्रज्ञांची एक बाजू आहे.
जीएम पिके अन्नसुरक्षेचा आधार बनू शकतात असे काही जाणकारांचे मत आहे. अशा परिस्थितीत
कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी नुकतेच जीएम मोहरीच्या विविध मुद्यांवर तपशीलवार निवेदन प्रसारित केले आहे.
जीएम मोहरीला विरोध करणाऱ्यांकडून जीएम मोहरीच्या डीएमएच ११ या वाणाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत.
या मोहरीचे अधिकृतपणे आणि योग्य व्यवस्थापन करुन उत्पादन घेतल्यास ते मानवी आरोग्य, प्राणी आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे का? याबाबत मुल्यांकन केले गेले.