Amravati News : बदलापूर येथे झालेली घटना दुर्देवी असून मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशा घटना होऊ नये याकरिता भाजपने शनिवारी (ता.२४) राज्यभरात ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबविले. अमरावती येथील इर्वीन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक झालेल्या या अभियानाच्या निमित्ताने सहभागी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौन धारण केले.
बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून काँग्रेसकडून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर भाजपने देखील राज्यभरात अशा घटना होऊ नये याकरिता शनिवारी (ता.२४) जागर जाणिवेचा हे अभियान राबविले. त्या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी मौनव्रत धारण केले होते.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले, की केवळ बदलापूरच नव्हे, जिथे कुठे अशा घटना घडतात, त्या राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाही. मानवतेला त्या काळिमा फासणाऱ्या असतात. ही प्रवृती समाजाने ठेचून काढली पाहिजे. बदलापूर घटनेतील आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातही अशा घटना घडल्या. त्या वेळी आम्ही विरोधीपक्ष म्हणून सरकारच्या पाठीशी राहण्याचे काम केले, अशी आठवण त्यांनी करून दिली. डॉ. आशिष देशमुख, जयंत डेहनकर यांच्यासह भाजप पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.