Embryo Transplantation Technology : भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून सहिवाल कालवडीचा जन्म

Sahiwal Cow : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून संकरित गाईने सहिवाल कालवडीला जन्म दिला आहे.
Sahiwal Cow
Sahiwal CowAgrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून संकरित गाईने सहिवाल कालवडीला जन्म दिला आहे. राहुरी तालुक्यातील खडांबे येथील शेतकरी संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यात हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक साहाय्याने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आयव्हीएफ तंत्रज्ञानातून तयार केलेले उच्च वंशावळीचे भ्रूण ऋतुचक्र नियमन केलेल्या सरोगेट गायीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करण्यात येते.

Sahiwal Cow
Cattle Conservation : सेवाभावी वृत्तीने नृसिंहवाडीत गोसंवर्धन

खडांबे (ता. राहुरी) येथील संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यातील एचएफ गाईच्या गर्भाशयात (साहिवाल पिता एसए-२९ व दाता गायी एस-९४२२) देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून सोडण्यात आले. २७३ दिवसानंतर हा प्रयोग यशस्वी होत संकरित गायीपोटी उच्च वंशावळीच्या सहिवाल कालवडीचा जन्म झाला आहे. या सहिवाल जातीच्या कालवडीचे जन्मत: वजन २७ किलो आहे. प्रतिवेत दूध उत्पादन क्षमता ४५०० लिटर असेल.

संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, डॉ. विष्णू नरवडे, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व डॉ. धीरज कंखरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशी गोवंशाचे जतन व संवर्धनाचा कार्यक्रम सुरू आहे.

Sahiwal Cow
Indigenous Cattle : देशी गोवंश संवर्धनासाठी ॲप, आधार कार्ड निर्मिती

आतापर्यंत ६ गीर, १ सहिवाल कालवडीचा जन्म

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले, ‘‘देशी गोवंशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या गोठ्यात देशी गोवंशाचा पैदास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ६ गीर व १ सहिवाल कालवडीचा जन्म झालेला आहे.’’

उच्च दर्जाच्या वळू व चांगल्या दुधाच्या साहिवाल गाईचे भ्रुण सात दिवसांत संकरित गाईच्या गर्भाशयात सोडले. त्यामुळे मूळ वंशावळीची साहिवाल कालवड जन्मली आहे. देशी गाईंची संख्या वाढवून जतन व संवर्धन करणे, दुधाची क्षमता वाढवण्यासाठी संशोधन केंद्र काम करत आहे.
डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com