Biodiversity Conservation: जैवविविधताच मानवाला वाचवेल

Senior Environmental Expert Dr. Madhav Gadgil: स्थानिक जैवविविधतेप्रति संवेदनशिल राहिलो तरच गाव खेड्यांचे पर्यावरणीय महत्त्व टिकणार असून, तीच जैवविविधता मानवाला वाचविणार आहे. याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे गोव्यातीत खारपुटीवर आधारित पर्यावरणीय अर्थव्यवस्था व पश्‍चिम बंगालमधील हावडा येथील भातशेती आणि तलाव संवर्धन आहे.
Book Festival
Book FestivalAgrowon
Published on
Updated on

Pune News: स्थानिक जैवविविधतेप्रति संवेदनशिल राहिलो तरच गाव खेड्यांचे पर्यावरणीय महत्त्व टिकणार असून, तीच जैवविविधता मानवाला वाचविणार आहे. याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे गोव्यातीत खारपुटीवर आधारित पर्यावरणीय अर्थव्यवस्था व पश्‍चिम बंगालमधील हावडा येथील भातशेती आणि तलाव संवर्धन आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले.

Book Festival
Water Conservation : शिवारफेरी: जलसंवर्धनासाठी लोकसहभागाचे प्रभावी तंत्र

‘वनराई’ संस्थेच्या वतीने आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मश्री डॉ. माधव गाडगीळ आणि प्रा. डॉ. विजय एदलाबादकर लिखित ‘लोक जैवविविधता नोंदवही’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (ता. २५) गाडगीळ बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, वनराईचे विश्‍वस्त सागर धारिया, सचिव अमित वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘‘२००२ मध्ये जैवविविधता संवर्धनाचा कायदा आला. मात्र जैवविविधता नोंदवह्यांची शास्त्रोक्त नोंद झाली नाही हे वास्तव आहे. स्थानिक जैवविविधतेची शास्त्रोक्त अचूक नोंद डिजिटल माध्यमातून करणे गरजेचे आहे. तर केवळ नोंदणी न करता, त्याचे व्यवस्थापन, संवर्धनासाठी अधिक काम करण्याची गरज आहे. त्यासाठी हे पुस्तक अधिक फायदेशीर ठरणार आहे.’’

Book Festival
Soil And Water Conservation : शिवारातील पाणी शेतातच अडवून जिरविण्याचे उपाय

डॉ. मोरे म्हणाले, ‘‘जैवविविधता संवर्धनात ज्याला जस हव तस सहभागी झाले पाहिजे. कारण या विषयात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. माणसाच्या गरजा अनंत आहे. त्या गरजा निसर्ग पुरवू शकत नाहीत. गरजा वाढल्या की निसर्गाचा ऱ्हास वाढणारा आहे.’’

या वेळी देवाजी तोफा यांनी मनोगत व्यक्त केले. अमित वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राची वाडेकर यांनी केले. धारिया यांनी आभार मानले. आज प्रकाशित झालेले पुस्तक हे जैवविविधता संवर्धन, पर्यावरणाप्रति सरकारशी लढण्यासाठीचे शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर गरजेचा असल्याचे वंदना चव्हाण म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com