Mango Export : केसर आंबा निर्यातील मोठा वाव

Kesar Mango : केसर आंबा निर्यातीला मोठा वाव आहे. देशांतर्गत सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
Mango Market
Mango MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : केसर आंबा निर्यातीला मोठा वाव आहे. देशांतर्गत सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता एक एकर क्षेत्रावर अतिघन पद्धतीने केसर आंब्याची लागवड केल्यास उत्पादन सुरू झाल्यानंतर दर वर्षाला खर्च वजा जाता किमान चार लाख रुपयांचा निव्वळ नफा होऊ शकतो, असे मत महाकेशर आंबा उत्पादक संघाचे उपाध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर येथील गटशेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) नारायणगाव (पुणे) व महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) यांच्या वतीने ‘आंबा पीक - एक उत्तम शेती’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्‍घाटन केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी केले.

यानिमित्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांना डॉ. कापसे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे विश्वस्त प्रकाश पाटे, ग्रँट थोरटॉनचे सल्लागार ज्ञानेश थोरात, तंत्र अधिकारी प्रमोद बनकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ भरत टेमकर, डॉ. दत्तात्रय गावडे, योगेश यादव, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील प्रगतिशील आंबा उत्पादक व शेतकरी उपस्थित होते.

Mango Market
Mango Variety : ‘जुन्नर गोल्ड’ हापूसला, केसरचा स्वाद, राजापुरीचा आकार

डॉ. कापसे यांनी केसर आंब्याची अतिघन पद्धतीने (१४ x ६ फूट) दक्षिणोत्तर लागवड, जमिनीची निवड, लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, छाटणी, पॅक्लोब्युट्रॅझॉलचा (कल्टार) वापर, आंब्याची काढणी, आंबा पिकवण्याची सुधारीत पद्धत, पॅकिंग, ग्रेडिंग, विक्री व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. महाकेशर आंबा उत्पादक संघाच्या वतीने केशर आंबा उत्पादन, निर्यात, विक्री व्यवस्थापन या संदर्भात सहकार्य केले जाईल, असे आश्वासन डॉ. कापसे यांनी या वेळी दिले.

या वेळी मॅग्नेटचे प्रकल्प अधिकारी अजय कुदळे यांनी युरोगॅप, ग्लोबल गॅप याबाबत, प्रा. भरत टेमकर यांनी सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने आंबा उत्पादन या बाबत, पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी आंबा पिकातील कीड व्यवस्थापन व मोहोर संरक्षण या विषयी तर मॅग्नेटचे संतोष इंगळे यांनी कृषी क्षेत्रातील स्त्री-पुरुष समानता संदर्भात, ज्ञानेश थोरात यांनी मॅग्नेट प्रकल्पाची पार्श्‍वभूमी व विविध योजना याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Mango Market
Mango Management : अतिघन बागेत उत्तम बहरासाठीचे तंत्र

अनिल मेहेर म्हणाले, ‘‘कृषी पणन मंडळाने मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत विविध पिकाच्या मूल्यसाखळी व्यवस्थापनाकरिता पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून कृषी प्रकल्प हाती घ्यावेत. बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकाच्या उत्पादनासंदर्भातच्या कामकाजपद्धती ठरवाव्यात.

जमीन, हवामान यांचा अभ्यास करून त्यांच्या विभागनिहाय पीक उत्पादन पद्धती शेतकऱ्यांना सूचवाव्यात. बाजारपेठेच्या मागणीनुसार कृषिमाल उत्पादनावर भर द्यावा. गुणवत्तापूर्व कृषिमाल निर्मितीवर भर द्यावा. कृषिमाल निर्यातीच्या पायाभूत सुविधा ग्रामीण भागामध्ये निर्माण कराव्यात. प्रा. टेमकर यांनी सूत्रसंचलन केले. प्रक्षेत्र व्यवस्थापक वैभव शिंदे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com