APMC Strike : बाजार समित्यांच्या बंदला पश्‍चिम विदर्भात मोठा प्रतिसाद

APMC Conference : गेल्या आठवड्यात निगडी पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला राज्यातील ३०६ बाजार समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, सचिव आमंत्रित होते.
APMC Strike
APMC Strike Agrowon
Published on
Updated on

Akola News : बाजार समित्यांच्या राज्यव्यापी बंदला पश्‍चिम विदर्भातील तीनही जिल्ह्यांत मोठा प्रतिसाद मिळाला. विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता. ७) बंद पुकारण्यात आला होता. गेल्या आठवड्यात निगडी पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेला राज्यातील ३०६ बाजार समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, सचिव आमंत्रित होते. या परिषदेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री तसेच अधिकारी निमंत्रित होते. मात्र, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशिवाय तेथे इतर मंत्री आले नव्हते. पणनमंत्रीसुद्धा कार्यक्रमस्थळी उशिराने पोचले.

APMC Strike
APMC Closed : पणनमंत्र्यांच्या विरोधातील बाजार बंदला मोठा प्रतिसाद

त्यांनी मंत्रिमंडळ बैठक असल्याचे सांगत लवकरच काढता पाय घेतला. यामुळे राज्यभरातून उपस्थित असलेल्या बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त झाली. वास्तविक या राज्यव्यापी परिषदेतून आपल्या समस्यांना वाचा फुटेल, प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती.

परंतु परिषदेतून फारसे काही साध्य झाले नाही. मागण्यांना, प्रश्‍नांना न्याय मिळू शकला नाही. याचा निषेध म्हणून सोमवारी बंदची हाक देण्यात आली होती. सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बंदचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला.

APMC Strike
APMC Land Decision : बाजार समित्यांना मिळणार नाममात्र दरात शासकीय जागा

बंदमध्ये सहभागी बाजार समित्या

पश्‍चिम विदर्भात मलकापूर या बाजार समितीत व्यवहार सुरू होते. उर्वरित सर्वच ठिकाणी बंद पाळण्यात आला. अकोला, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, खामगाव, शेगाव, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, जळगाव जामोद, वाशीम, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव अशा विविध बाजार समित्यांमध्ये बंद पाळल्या गेला.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या टिकून राहण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेमध्ये उपस्थित राज्यातील ३०६ बाजार समित्यांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना शासनामार्फत करण्यात येईल, अशी सर्वांना आशा होती. तसेच राज्यातील बाजार समित्यांच्या मागण्या व अडीअडचणींवर सदर परिषदेमध्ये चर्चा होणे आवश्यक होती.
- विलास पुंडकर, अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघ, महाराष्ट्र राज्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com