APMC Closed : पणनमंत्र्यांच्या विरोधातील बाजार बंदला मोठा प्रतिसाद

Abdul Sattar : समित्यांच्या राज्यव्यापी परिषदेमधून पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतल्याच्या निषेधार्थ राज्य बाजार समितीने सोमवारी (ता. ७) पुकारलेल्या बंदला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
APMC
APMCAgrowon
Published on
Updated on

Pune News : बाजार समित्यांच्या विकासकामांच्या परवानगीसाठी पणन संचालनालयाकडून होणाऱ्या आर्थिक मागणीच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे समित्यांच्या राज्यव्यापी परिषदेमधून पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतल्याच्या निषेधार्थ राज्य बाजार समितीने सोमवारी (ता. ७) पुकारलेल्या बंदला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राज्यातील ३०५ पैकी १९९ बाजार समित्यांनी बंद ठेवत पणनमंत्र्यांचा निषेध केला. मात्र पुणे, मुंबई बाजार समित्यांनी बंदमध्ये सहभाग न घेतल्याने, या बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत होते.

APMC
APMC Strike : पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात बाजार समित्यांचा आज बंद

पणन मंडळ आणि बाजार समिती संघाच्या वतीने राज्यव्यापी परिषदेतील आरोप प्रत्यारोपांमुळे व्यथित झालेल्या पणनमंत्री सत्तार यांनी सभागृहातून काढता पाय घेतला होता. याच्या निषेधार्थ बाजार समिती संघाने सोमवारी (ता. ७) बंद पुकारला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे बाजार समितीचे कामकाज सुरळीत होते. मात्र जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोर आणि तळेगाव दाभाडे बाजार समित्या बंदमध्ये सहभागी झाल्या. नाशिक, सोलापूर जिल्ह्यांतही अनेक बाजार समित्या बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या.

APMC
APMC Election : आमदारकीच्या इच्छुकांची बाजार समितीत कसोटी

विभाग एकूण बाजार समित्या सुरू बंद

कोल्हापूर २१ ८ १३

पुणे २३ १२ ११

अमरावती ५५ ०० ५५

नागपूर ५० १ ४९

लातूर ४७ २१ २६

छत्रपती संभाजीनगर ३६ १३ २३

नाशिक ५३ ३४ १९

रत्नागिरी २० ११ ९

पणन मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध म्हणून बाजार समिती संघाने पुकारलेल्या बंदमध्ये ९० टक्के समित्या सहभागी झाल्या होत्या. बाजार समित्यांचे प्रश्‍न राज्य सरकारने सोडवावेत, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करावे लागेल.
बाळासाहेब नहाटा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com